TRENDING:

सावधान! 'या' 4 राशींची लोक असतात खूपच 'सेल्फिश', स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात

Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार, माणसाचा स्वभाव त्याच्या राशीवर अवलंबून असतो. काही राशीचे लोक अत्यंत दयाळू आणि परोपकारी असतात, तर काही राशींच्या बाबतीत मात्र 'कामापुरता मामा' ही म्हण तंतोतंत लागू पडते.
advertisement
1/6
'या' राशींची लोक असतात खूपच 'सेल्फिश', तुमची रास तर यात नाही ना?
ज्योतिषशास्त्रानुसार, माणसाचा स्वभाव त्याच्या राशीवर अवलंबून असतो. काही राशीचे लोक अत्यंत दयाळू आणि परोपकारी असतात, तर काही राशींच्या बाबतीत मात्र 'कामापुरता मामा' ही म्हण तंतोतंत लागू पडते.
advertisement
2/6
ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, मेष, सिंह, मिथुन आणि कुंभ या चार राशींच्या व्यक्ती स्वतःच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देतात. आपले काम यशस्वीपणे पूर्ण करून घेण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात, ज्यामुळे अनेकदा त्यांना 'स्वार्थी' किंवा 'सेल्फिश' म्हटले जाते.
advertisement
3/6
मेष - 'मी' पणाचं वर्चस्व: मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीच्या व्यक्ती अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि धाडसी असतात. मात्र, स्पर्धा जिंकण्याच्या नादात ते अनेकदा इतरांच्या भावनांचा विचार करायला विसरतात. 'सर्वात आधी मी' हा त्यांचा स्वभाव असतो. आपले ध्येय गाठण्यासाठी ते कोणावरही दबाव टाकू शकतात.
advertisement
4/6
सिंह - प्रसिद्धीची भूक: सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. या राशीच्या लोकांना नेहमी 'सेंटर ऑफ अट्रॅक्शन' राहायला आवडते. स्वतःचे कौतुक करून घेण्यासाठी किंवा स्वतःचे वर्चस्व टिकवण्यासाठी ते दुसऱ्यांना बाजूला सारू शकतात. जेव्हा हक्काची किंवा अधिकाराची गोष्ट येते, तेव्हा ते कमालीचे स्वार्थी बनतात.
advertisement
5/6
मिथुन - दुहेरी स्वभाव: मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. या व्यक्ती बोलण्यात अत्यंत हुशार असतात. गोड बोलून आपले काम करून घेण्यात यांचा हात कोणीही धरू शकत नाही. मात्र, काम फत्ते झाल्यावर ते समोरच्या व्यक्तीला विसरून जातात. त्यांच्या दुहेरी स्वभावामुळे ते कधी आपले हित साधतील, याचा अंदाज लावणे कठीण असते.
advertisement
6/6
कुंभ - व्यावहारिक आणि अलिप्त: कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. या व्यक्ती खूप बुद्धिमान असतात, पण भावनिकदृष्ट्या अलिप्त असतात. स्वतःच्या प्रगतीसाठी किंवा स्वतःच्या तत्त्वांसाठी ते कोणाशीही संबंध तोडू शकतात. ते जे काही करतात, त्यामागे त्यांचा स्वतःचा काहीतरी दूरचा फायदा दडलेला असतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
सावधान! 'या' 4 राशींची लोक असतात खूपच 'सेल्फिश', स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल