TRENDING:

Riteish - Genelia Wedding : 14 वर्षांचा संसार, रितेश - जेनिलियाच्या लग्नाचे UNSEEN PHOTO, 11व्या फोटोवरून नजरच हटणार नाही

Last Updated:
Riteish-Genelia Wedding Unseen Photos : अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख यांच्या लग्नाला 14 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्तानं जेनिलियानं दोघांचे लग्नातील अनसीन फोटो शेअर केलेत.
advertisement
1/12
14 वर्षांचा संसार, रितेश-जेनिलियाच्या लग्नाचे UNSEEN PHOTO, 11वा तर लई भारी!
बॉलिवूडच नाही तर मराठीतील आदर्श जोडप्यांपैकी एक म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनिलिया देशमुख. दोघेही महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी आहेत.
advertisement
2/12
आज 3 फेब्रुवारी रोजी रितेश - जेनिलियाच्या लग्नाला 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या दिवसानिमित्त जेनिलियाने सोशल मीडियावर रितेशसाठी खास पोस्ट शेअर करत त्याच्या लग्नातील काही अनसीन फोटो शेअर केलेत. 
advertisement
3/12
जेनिलियानं लग्नाच्या वाढदिवसानिमित्त रितेशला शुभेच्छा देत पोस्टमध्ये लिहिलंय, "आय लव्ह यू माय पार्टनर. आज, उद्या आणि कायमच. या सुंदर आयुष्याच्या चॅप्टरमध्ये तू नेहमीच माझा आवडता चॅप्टर राहशील. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा"
advertisement
4/12
रितेश आणि जेनिलियाचं लग्न 3 फेब्रुवारी 2012 रोजी झालं. दोघे 14 वर्षांचा सुखी संसार करत आहेत. दोघांना रिहान आणि राहिल अशी दोन मुलं आहेत. 
advertisement
5/12
रितेश आणि जेनिलियाचं लग्न दोन पद्धतींनी पार पडलं होतं. आधी महाराष्ट्रीयन पद्धतीने आणि नंतर ख्रिश्चन पद्धतीने विवाहसोहळा झाला. त्यामुळे त्यांच्या लग्नात दोन्ही परंपरांचा सुंदर संगम पाहायला मिळाला होता. 
advertisement
6/12
जेनिलियाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये रितेशच्या वरातीचे फोटो, त्याला फेटा बांधतानाचे क्षणही पाहायला मिळतात. 
advertisement
7/12
महाराष्ट्रीयन लग्नातील अनेक महत्त्वाचे क्षण जेनिलियाने शेअर केले. सप्तपदी चालतानाचा दोघांचा फोटो.
advertisement
8/12
मंगलाष्टकाच्या वेळीचा क्षण आणि रितेश जेनिलियाच्या गळ्यात मंगळसूत्र घालतानाचा फोटोही जेनिलियानं शेअर केला आहे. 
advertisement
9/12
ख्रिश्चन पद्धतीच्या लग्नातील जेनिलियाचा व्हाइट गाऊनमधील सुंदर फोटो चाहत्यांना विशेष लक्ष वेधून घेत आहे. 
advertisement
10/12
तसेच दोघांच्या रिसेप्शनचेही काही खास फोटो तिने शेअर केले. या फोटोंमध्ये दोघांची केमिस्ट्री आणि आनंद स्पष्ट दिसतोय.
advertisement
11/12
रितेश जेनिलियाच्या आतापर्यंतच्या फोटोंमध्ये सगळ्यात लय भारी फोटो हा हळदी समारंभाचा आहे. दोघेही हळदीने माखलेले दिसत आहेत. या फोटोवरून चाहत्यांची नजर हटत नाहीये.
advertisement
12/12
रितेश आणि जेनिलिया हे सध्याचे पावर कपल म्हणून ओळखले जात आहेत. 14 वर्षांनंतरही त्यांच्यातील प्रेम आणि जिव्हाळा तसाच कायम आहे. दोघेही एकमेकांचा प्रचंड आदर करतात. रितेश आणि जेनिलियाला त्यांच्या लग्नाच्या खास दिवसानिमित्त चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Riteish - Genelia Wedding : 14 वर्षांचा संसार, रितेश - जेनिलियाच्या लग्नाचे UNSEEN PHOTO, 11व्या फोटोवरून नजरच हटणार नाही
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल