Numerology: पटणार की भांडत बसणार? दोघांच्या जन्मतारखांवरून आधीच ओळखून घेऊ शकता
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Numerology Marathi: अंकशास्त्रानुसार, जन्मतारीख आणि तिच्यावरून येणारा मूलांक विवाहाविषयी फार महत्त्वाचा मानला जातो. कोणत्या जन्मतारखेच्या लोकांना लग्नासाठी कोणत्या जन्मतारखा लकी ठरतात, पाहुया. लव्ह मॅरेज होणार की अॅरेंज मॅरेज हे मूलांकावरून कसं ओळखायचं हे जाणून घेऊ या.
advertisement
1/10

अनेकांना विवाहाविषयी मनात धाकधूक असते. आपलं लव्ह मॅरेज होणार की अ‍ॅरेंज मॅरेज असा प्रश्न अनेकांना सतावतो. अंकशास्त्रातून याचं उत्तर मिळू शकतं. लव्ह मॅरेज होणार की अ‍ॅरेंज मॅरेज, कोणता मूलांक असलेल्या व्यक्तीशी विवाह करणं योग्य आहे हे अंकशास्त्र सांगू शकतं. जन्मतारखेची बेरीज करून मूलांक काढला जातो. यावरून संबंधित व्यक्तीचा स्वभाव, प्रकृती, गुण आणि दोष याचा अंदाज बांधता येतो. मूलांकानुसार विवाह कसा होऊ शकतो, ते पाहू या.
advertisement
2/10
मूलांक 1 : कोणत्याही महिन्यातल्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो. या मूलांकाच्या व्यक्ती खूप प्रॅक्टिकल असतात; पण विवाह, प्रेमाच्या बाबतीत लाजाळू असतात. लहानपणापासून आवडणाऱ्या व्यक्तीला प्रपोझ करण्यासाठी या व्यक्ती खूप वर्षं लावतात; पण शेवटी विवाह त्यांच्यासोबतच करतात. या मूलांकाच्या व्यक्तींचा विवाह 2, 4, 6 या मूलांकाच्या व्यक्तीशी झाला तर तो फायदेशीर ठरतो. या मूलांकाचे जोडीदार 1 मूलांकाच्या व्यक्तीसाठी श्रेयस्कर ठरतात. त्यामुळे मूलांक 1 असलेल्या व्यक्तींनी हा मूलांक असलेल्या व्यक्तीशी विवाह करावा.
advertisement
3/10
मूलांक 2 : कोणत्याही महिन्याच्या 2, 11 किंवा 20 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. या व्यक्ती खूप मूडी असतात. तसंच त्या स्वतःच्या मनाप्रमाणे वागणारे असतात; पण प्रेम फार विचारपूर्वक करतात. या व्यक्ती सामान्यपणे लव्ह मॅरेज करतात. त्यांच्यासाठी 1, 3 किंवा 6 मूलांक असलेला जोडीदार चांगला ठरतो. त्यामुळे त्यांनी या मूलांकाच्या व्यक्तीशी विवाह करावा.
advertisement
4/10
मूलांक 3 : महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. या व्यक्ती फार रोमँटिक नसतात. ते त्यांच्या जोडीदारावर डॉमिनेट करतात. त्यामुळे यांच्यासाठी 2, 6 किंवा 9 मूलांक असलेले पार्टनर योग्य ठरतात. त्यांचा विवाह या मूलांकाच्या व्यक्तीशी झाला तर जीवनातल्या सर्व समस्या संपुष्टात येऊ लागतात आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळायला सुरुवात होते.
advertisement
5/10
मूलांक 4 : कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. बऱ्याच वेळा या व्यक्ती एकापेक्षा जास्त व्यक्तींशी रिलेशनशिपमध्ये असतात. लव्ह मॅरेज केल्यावरही विवाहबाह्य संबंधांमुळे विवाह मोडण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे या व्यक्तींसाठी 1, 2, 7 किंवा 8 मूलांक असलेला जोडीदार चांगला जीवनसाथी ठरू शकतो. या व्यक्तीनी या मूलांकाच्या व्यक्तीशी विवाह केल्यास फायदा होतो.
advertisement
6/10
मूलांक 5 : महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्म झालेल्या व्यक्तींचा मूलांक 5 असतो. या व्यक्तींसाठी विवाहाकरिता कुटुंबाचं मत खूप महत्त्वाचं असतं. या व्यक्तींना लव्ह मॅरेज करायचं असेल तर त्या सर्वप्रथम कुटुंबाची सहमती मिळवतात. 5 आणि 8 मूलांक असलेल्या व्यक्ती एकमेकांचे चांगले जोडीदार ठरतात. तसंच लव्ह लाइफमध्ये चांगलं नातं निर्माण करण्यात यशस्वी होतात.
advertisement
7/10
मूलांक 6 : कोणत्याही महिन्यात 6, 15, 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 6 असतो. या व्यक्ती खूप आकर्षक असतात. लोक यांच्याकडे पटकन आकर्षित होतात आणि त्यांना प्रपोझ करतात. या व्यक्तींचं जोडीदाराशी भावनिक नातं लवकर निर्माण होत नाही. या मूलांकाच्या व्यक्तींचं सर्वांशी चांगलं पटतं. ते कोणताही मूलांक असलेल्या व्यक्तीशी विवाह करू शकतात.
advertisement
8/10
मूलांक 7 : तुमचा जन्म कोणत्याही महिन्यात 7, 25 किंवा 16 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असतो. मूलांक 7 असलेल्या व्यक्ती तत्त्वज्ञानी असतात. त्या खूप दृढ निश्चयी असतात. एखादं काम हाती घेतलं की ते पूर्ण झाल्यावरच शांत होतात. 7 मूलांक असलेल्या व्यक्तींनी 1 किंवा 8 मूलांक असलेल्या व्यक्तीशी विवाह करावा. कारण या मूलांकाच्या व्यक्ती गंभीर असतात आणि अचूकपणे भावना ओळखू शकतात.
advertisement
9/10
मूलांक 8 : ज्या व्यक्तींचा जन्म महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला झालेला असतो, त्यांचा मूलांक 8 असतो. या मूलाकांच्या व्यक्ती गूढ स्वभावाच्या असतात. त्यांना कोणाची खुशामत करायला आवडत नाही. या मूलांकाच्या व्यक्तींनी विवाहासाठी 2, 3, 5, 6 या मूलांकाचा जोडीदार निवडावा.
advertisement
10/10
मूलांक 9 : तुमचा जन्म महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 9 असतो. यांचं लव्ह लाइफ सामान्य असतं; पण जोडीदाराशी काही वेळा ताण वाढू शकतो. याचा परिणाम साहजिकच नात्यावर होतो; मात्र जसजसा काळ पुढे सरकतो, तसतशी स्थिती सुधारत जाते. या व्यक्तींनी 1, 3, 5, 6 या मूलांकाच्या व्यक्तीशी विवाह करावा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology: पटणार की भांडत बसणार? दोघांच्या जन्मतारखांवरून आधीच ओळखून घेऊ शकता