TRENDING:

Numerology: नशिबाचा खेळ! या जन्मतारखा असणाऱ्यांची लव्ह मॅरेज होतात; जास्त विरोध नाही होत

Last Updated:
Love Marriage Numerology : अंकशास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीच्या जन्मतारखेला विशेष महत्त्व आहे. काही तारखा अशा आहेत, त्या दिवशी जन्मलेल्या लोकांचे प्रेमविवाह होण्याची शक्यता जास्त असते. या लोकांना प्रेमविवाहासाठी जास्त संघर्ष करावा लागत नाही.
advertisement
1/6
नशिबाचा खेळ! या जन्मतारखा असणाऱ्यांची लव्ह मॅरेज होतात; जास्त विरोध नाही होत
अंक ज्योतिषाच्या माध्यमातून आपण एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याच्या स्वभाव, व्यक्तिमत्त्व आणि भविष्याबद्दल माहिती मिळवू शकतो. जन्मतारखेचे अंक जोडून मिळणाऱ्या संख्येला मूलांक संख्या म्हणतात.
advertisement
2/6
लग्न हे एक पवित्र बंधन आहे; यामुळे केवळ दोन व्यक्ती एकत्र येत नाहीत तर दोन कुटुंबे देखील जोडली जातात. बहुतेक लोक अलिकडे अरेंज मॅरेजऐवजी लव्ह मॅरेजला प्राधान्य देत आहेत. अनेक कुटुंबातील समस्या अशी आहे की, नातेवाईक लग्नाला सहमत होत नसतात. तर काही ठिकाणी प्रेमसंबंधांना व्यवस्थित लग्नात बदलण्याचा प्रयत्न करतात. कोणत्या मूलांकांचे प्रेमविवाह होण्याची शक्यता जास्त असते याविषयी जाणून घेऊ.
advertisement
3/6
मूलांक 3: कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो. असे लोक खूप मिलनसार आणि बोलके असतात. यांचा स्वभाव लोकांना स्वतःकडे आकर्षित करतो. प्रेमात यांचे जोडीदाराशी खूप सखोल नाते असते, अनेकजण प्रेमविवाहासाठी प्रयत्न करतात.
advertisement
4/6
मूलांक 5: कोणत्याही महिन्याच्या 5, 14 आणि 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो. हे लोक आपले जीवन स्वातंत्र्याने जगण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या रोमँटिक स्वभावामुळे, हे लोक बहुतेकदा प्रेमविवाहाचा पर्याय निवडतात.
advertisement
5/6
मूलांक 6: कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 6 असतो. असे लोक प्रेमात खूप संवेदनशील असतात. नात्यांबद्दलची त्यांची ओढ त्यांना भावनिकदृष्ट्या जोडते. असे लोक त्यांच्या जोडीदाराशी खूप सखोल भावनिक बंध प्रस्थापित करण्यात यशस्वी होतात.
advertisement
6/6
मूलांक 9: कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 9 असतो. अंकशास्त्रानुसार, असे लोक खूप हट्टी मानले जातात. ते सामाजिक रीतिरिवाजांच्या विरोधात जाऊन कोणत्याही परिस्थितीत प्रेमविवाह करून घेतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology: नशिबाचा खेळ! या जन्मतारखा असणाऱ्यांची लव्ह मॅरेज होतात; जास्त विरोध नाही होत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल