TRENDING:

प्रेमासाठी आयुष्यभर तरसतात, 'या' मूलांकाच्या लोकांना प्रेमात मिळतो नेहमीच धोका; तुमची जन्मतारीख तर नाही ना?

Last Updated:
अंकशास्त्रानुसार, आपल्या जन्मतारखेचा आपल्या स्वभावावर आणि भाग्यावर मोठा प्रभाव असतो. काही लोक प्रेमाच्या बाबतीत खूप नशीबवान असतात, तर काही लोक आयुष्यभर खऱ्या प्रेमासाठी तरसतात.
advertisement
1/7
प्रेमासाठी आयुष्यभर तरसतात, 'या' मूलांकाच्या लोकांना प्रेमात मिळतो नेहमीच धोका
अंकशास्त्रानुसार, आपल्या जन्मतारखेचा आपल्या स्वभावावर आणि भाग्यावर मोठा प्रभाव असतो. काही लोक प्रेमाच्या बाबतीत खूप नशीबवान असतात, तर काही लोक आयुष्यभर खऱ्या प्रेमासाठी तरसतात. अंकशास्त्रात अशा एका विशिष्ट मूलांकाचा उल्लेख आहे, ज्यांच्या प्रेमजीवनात संघर्षाचे प्रमाण जास्त असते आणि ज्यांचे हृदय वारंवार तुटते. तो मूलांक म्हणजे मूलांक 7.
advertisement
2/7
भावना व्यक्त करण्यात अडचण: मूलांक 7 चे लोक स्वभावाने खूप हळवे आणि भावनिक असतात. मात्र, त्यांना आपल्या भावना शब्दांत मांडणे जमत नाही. ते सर्व काही मनात दाबून ठेवतात, ज्यामुळे जोडीदाराचा गैरसमज होतो आणि नात्यात दुरावा येतो.
advertisement
3/7
एकटेपणाची ओढ: या मूलांकाचा स्वामी 'केतू' आहे. केतू हा विरक्तीचा कारक मानला जातो. यामुळे या लोकांना वारंवार एकांतात राहणे आवडते. त्यांच्या या स्वभावामुळे जोडीदाराला आपण दुर्लक्षित आहोत असे वाटू लागते, जे ब्रेकअपचे मुख्य कारण ठरते.
advertisement
4/7
अतिविचार: हे लोक नात्यात खूप विचार करतात. जोडीदाराच्या प्रत्येक कृतीचा खोलवर अर्थ शोधण्याच्या प्रयत्नात ते स्वतःच मानसिक त्रास करून घेतात. संशयी वृत्ती नसली तरी अतिसंवेदनशीलतेमुळे हे लोक दुखावले जातात.
advertisement
5/7
अपरिपक्वता आणि चुकीची निवड: मूलांक 7 चे लोक प्रेमाच्या बाबतीत थोडे अपरिपक्व असतात. ते सहजासहजी कोणावरही विश्वास ठेवतात आणि चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडतात. परिणामी, त्यांना वारंवार धोक्याचा सामना करावा लागतो.
advertisement
6/7
स्वातंत्र्याची ओढ: या लोकांना आपल्या वैयक्तिक आयुष्यात कोणाचाही हस्तक्षेप आवडत नाही. जरी ते प्रेमात असले तरी त्यांना स्वतःची 'स्पेस' हवी असते. ही गोष्ट अनेकदा जोडीदाराला खटकते आणि वादाला सुरुवात होते.
advertisement
7/7
खऱ्या प्रेमाचा शोध कधी संपत नाही: हे लोक आयुष्यभर अशा एका जोडीदाराच्या शोधात असतात जो त्यांना न बोलता समजून घेईल. मात्र, प्रत्यक्षात असा जोडीदार मिळणे कठीण असते, ज्यामुळे हे लोक प्रेमात असूनही स्वतःला एकटे समजतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
प्रेमासाठी आयुष्यभर तरसतात, 'या' मूलांकाच्या लोकांना प्रेमात मिळतो नेहमीच धोका; तुमची जन्मतारीख तर नाही ना?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल