TRENDING:

June Horoscope : 1 जूनपासून फक्त नोटा मोजणार या 4 राशींचे लोक; ग्रहांचा सेनापती करणार कमाल

Last Updated:
Mangal Gochar Horoscope Marathi: ग्रहांचा सेनापती मानला जाणारा मंगळ ग्रह जवळपास एक महिना मेष राशीमध्ये असणार आहे. हा कालावधी काही राशींसाठी अतिउत्तम असेल. या काळात अडकलेली कामं पूर्ण होऊन नवीन संधीही मिळू शकतात.
advertisement
1/6
1 जूनपासून फक्त नोटा मोजणार या 4 राशींचे लोक; ग्रहांचा सेनापती करणार कमाल
ग्रहांच्या राशीबदलाचे विविध राशींवर बरे-वाईट परिणाम होत असतात. काहींचं भाग्य उजळतं, तर काहींना समस्यांना सामोरं जावं लागतं. या राशीबदलामुळे काही योगही होतात. त्यांचेही शुभ परिणाम काही राशींवर दिसून येतात. येत्या एक जूनला मंगळ ग्रह राशीबदल करणार असून, तो मेष राशीत प्रवेश करेल. त्यामुळे तीन राशींवर त्यांचे चांगले परिणाम पाहायला मिळतील.
advertisement
2/6
ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह काही कालावधीसाठी विशिष्ट राशीमध्ये भ्रमण करत असतो. ठराविक काळानंतर तो एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. मंगळ ग्रह सध्या मीन राशीमध्ये आहे. येत्या एक जूनला तो मेष राशीत प्रवेश करणार आहे. मेष ही मंगळ ग्रहाच्या अधिपत्याखाली असलेलीच रास आहे. 12 जुलैपर्यंत मंगळ याच राशीत भ्रमण करणार आहे. मंगळाच्या राशीबदलाचा तीन राशींना चांगला फायदा होणार आहे. त्या राशींच्या लोकांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल व यश मिळेल.
advertisement
3/6
मेष रास - मेष ही मंगळ ग्रहाची रास आहे. त्यामुळे मेष राशीच्या जातकांना मंगळाच्या राशीबदलाचा चांगला फायदा होईल. अडकलेली कामं मार्गी लागतील व नशिबाची भरपूर साथ मिळेल. व्यापाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल असेल. गुंतवणूक केल्यास त्याचा चांगला परिणाम पाहायला मिळेल. करिअरच्या बाबतीत चांगली प्रगती होईल. यश मिळेल. कौटुंबिक नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल. वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील.
advertisement
4/6
धनू रास - मंगळाचा राशीबदल धनू राशीच्या जातकांसाठीही भाग्यदायी ठरू शकेल. त्यांची मानसिक त्रासातून सुटका होईल. नोकरदारांना हा काळ उत्तम असेल, कारण त्यांच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तुमचं काम पाहून तुम्हाला बढती दिली जाऊ शकते, तसंच पगारवाढही होण्याची शक्यता असेल. कुटुंबासह तुम्ही एखाद्या प्रवासाला जाण्याचा योग येईल. भावंडांचं भरपूर सहकार्य लाभेल.
advertisement
5/6
मीन रास - मंगळानं मीन राशीतून मेष राशीत प्रवेश केल्याचा मीन राशीच्या जातकांनाही फायदा होईल. या राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. उत्पन्नाची नवी साधनं निर्माण होतील. धनलाभाचे प्रबळ योग येतील. खर्चात कपात होईल. नवरा-बायकोमधील वाद संपतील व एकमेकांचं सहकार्य मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल व अडकलेली कामं पूर्ण होतील. व्यापाऱ्यांना नवीन सौदे मिळतील. त्यातून त्यांना भरपूर फायदा होऊ शकतो. गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल राहील. त्याचे चांगले परिणाम दिसतील.
advertisement
6/6
मंगळ जवळपास एक महिना मेष राशीमध्ये असणार आहे. हा कालावधी या तीन राशींना उत्तम असेल. या काळात अडकलेली कामं पूर्ण होऊन नवीन संधीही मिळू शकतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
June Horoscope : 1 जूनपासून फक्त नोटा मोजणार या 4 राशींचे लोक; ग्रहांचा सेनापती करणार कमाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल