TRENDING:

iPhone 17 Air: जुनी दारू पण बाटली नवी कोरी! apple चा हा iphone पाहून फोन विकून टाकाल!

Last Updated:
आताही apple ने आतापर्यंतच सर्वात स्लिम असा फोन आणला आहे. हा फोन तुम्हाला जुन्या फोनची आठवण करून देईल, जसे आयफोन ६ वैगेरे. पण, Iphone air हा सगळ्या फोनपेक्षा वेगळा आहे. त्याचं वेगळं पण हे त्याच्या दिसण्यावरून तुम्हाला लक्षात येईल.
advertisement
1/10
iPhone 17 Air: जुनी दारू पण बाटली नवी कोरी! apple चा हा iphone पाहून फोन विकून ट
apple ने कंपनी मुळात जे काही करते तो ट्रेंड बनून जातो. आता त्यांनी तीन कॅमेऱ्याचा फोन आणाव की दणकट फ्रेमवाला फोन आणावा. लाँच होत नाही तेच जगभरात नवीन ट्रेंड सुरू होऊन जातो. आताही apple ने आतापर्यंतच सर्वात स्लिम असा फोन आणला आहे. हा फोन तुम्हाला जुन्या फोनची आठवण करून देईल, जसे आयफोन ६ वैगेरे. पण, Iphone air हा सगळ्या फोनपेक्षा वेगळा आहे. त्याचं वेगळं पण हे त्याच्या दिसण्यावरून तुम्हाला लक्षात येईल.
advertisement
2/10
ॲपलच्या apple event ला दणक्यात सुरुवात झाली. कंपनीने आता आतापर्यंतचा सगळ्यात स्लिम असा iPhone 17 Air लाँच केला आहे. हा आयफोन सगळ्यात स्लिम असल्याचं सांगितलं जात आहे. हा फोन फक्त 5.6mm इतका स्लिम आहे. पण, डिझाईन जरी बारीक असली तरी हा फोन फिचर्सच्या बाबतीत कुठे कमी नाही.
advertisement
3/10
iPhone 17 Air मध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले दिला आहे, जो 120Hz ProMotion रिफ्रेश रेट सपोर्ट करतो.  याचा अर्थ असा की स्क्रीनवर अॅनिमेशन आणि स्क्रॉलिंग आता आणखी आरामात होईल.  लॉक स्क्रीनवर हा रिफ्रेश रेट 1Hz पर्यंत कमी होतो, ज्यामुळे फोनची बॅटरी आणखी वाचणार आहे.
advertisement
4/10
iPhone 17 Air मध्ये सुरक्षेचा विचार करण्यात आला आहे. यामध्ये फ्रंट आणि मागे Ceramic Shield दिली आहे, त्यामुळे फोन पडला तरी काही होणार नाही, एवढंच फोनवर स्क्रॅच सुद्धा येणार नाही, असा दावा कंपनीने केला आहे.  पण, या फोनमध्ये एकच कॅमेरा दिला आहे. 48 MP चा मागे आणि 18 MP चा समोर कॅमेरा दिला आहे.
advertisement
5/10
एवढंच नाहीतर फोनच्या बाजूला नेहमीसारखी बटणं दिली आहे, ज्यावर टच केले तर मेनू हॅपटीक मेनू सहज चेंज होतील. हे फिचर्स आधीच्या फोनमध्येही दिले आहे.
advertisement
6/10
या  फोनमध्ये Apple चं नवीन A19 Pro चीप लावण्यात आली आहे. जी स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये सर्वात पॉवरफुल आहे ही चिप ऑन-डिवाआस AI प्रोसेसिंगला सपोर्ट करतोय, ज्यामुळे अॅप्स आणि गेम आरामात खेळता येईल.
advertisement
7/10
iPhone 17 Air हा चार रंगात उपलब्ध आहे.  iPhone स्लिम आणि स्टायलिश श्रेणीची नवीन आहे
advertisement
8/10
iPhone 17 Air हा ज्या लोकांना बारीक आणि वजनाने हलका आणि हा. परफॉर्मेंस फोन पाहिजे आहे, त्यांच्यासाठी तयार केला आहे.  या फोनमध्ये 120Hz डिस्प्ले आणि A19 Pro चिप दिली आहे.
advertisement
9/10
हा फोन इतका स्लिम आहे की, कंपनीने यासाठी एक एक्सेसरी दिली आहे, हे एका बॅगेचा बेल्ट सारखंच आहे, तुम्ही फोनला बांधू शकता आणि पर्ससारखा फोन कंबरेजवळ ठेवू शकता.
advertisement
10/10
apple ने आता सगळ्यात स्लिम असा iphone air लाँच केला आहे. हा सगळ्यात स्लिम असा फोन आहे, आता स्लिम असेल म्हणून किंमतही तशीच आहे. या फोनची किंमत 256 GB साठी 1 लाख 19 हजार 900 रुपयांपासून सुरू होते, 512 GB ची किंमत 139900 रुपये इतकी आहे. तर 1 टीबीची किंमत 159900 रुपये इतकी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
iPhone 17 Air: जुनी दारू पण बाटली नवी कोरी! apple चा हा iphone पाहून फोन विकून टाकाल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल