Janhvi Kapoor Fitness: डाएटमध्ये लपलंय जान्हवी कपूरच्या फिटनेसचं रहस्य, इतकं साधं की तुम्हीही करू शकता Follow!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Janhvi Kapoor Fitness: बॉलिवूडमध्ये जान्हवी कपूर केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या फिट आणि कर्वी फिगरसाठीही नेहमी चर्चेत असते. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी तिने फिटनेसच्या बाबतीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
advertisement
1/7

बॉलिवूडमध्ये जान्हवी कपूर केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या फिट आणि कर्वी फिगरसाठीही नेहमी चर्चेत असते. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी तिने फिटनेसच्या बाबतीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
advertisement
2/7
जान्हवी कपूर स्वतःला कसं फिट ठेवते? खरं तर हे सगळं तिच्या डाएटचं कमाल आहे. चला जाणून घेऊया तिच्या फिटनेसमागचं रहस्य.
advertisement
3/7
जान्हवी दिवसाची सुरुवात कोमट पाण्यात मध आणि लिंबू घालून करते. हे तिचं डिटॉक्स ड्रिंक असून ते मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करतं. त्यानंतर ती ती नाश्त्यात नेहमी हंगामी फळं, ज्यूस घेते. कधीकधी दह्यासोबत पराठाही तिच्या प्लेटमध्ये असतो.
advertisement
4/7
जान्हवीचा आहार हलका पण पौष्टिक असतो. ग्लूटेन-फ्री रोट्या, हंगामी भाज्या, पनीर किंवा चिकन हे तिचं रोजचं मेन्यू आहे. रात्री ती हलकं जेवण करते, जे बहुधा भाताच्या पदार्थांनी बनलेलं असतं. झोपण्याआधी 2-3 तास आधीच जेवण करण्याची ती सवय लावून घेतली आहे.
advertisement
5/7
जान्हवीच्या फिटनेसमागे वर्कआउट रुटीनदेखील आहे. ती कोअर ट्रेनिंग, योगा आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगला महत्व देते. आठवड्यातील 5-6 दिवस ती जिममध्ये वेळ घालवते. पिलाटेस सेशन्सही ती नियमित करते.
advertisement
6/7
फिटनेसची इतकी काळजी घेत असूनही जान्हवी तिच्या आवडीच्या गोष्टी कधीच टाळत नाही. पास्ता, मोमोज आणि चॉकलेट ही तिच्या चीट डेची खासियत आहे. फिटनेससाठी पुरेशी झोप आणि पाण्याचं महत्व ती वारंवार सांगते. दिवसाला किमान 8 तास झोप घेणं आणि भरपूर पाणी पिणं ही तिची सवय आहे.
advertisement
7/7
जान्हवीला तिच्या आई श्रीदेवीकडून फिट राहण्याची प्रेरणा मिळाली. श्रीदेवी स्वतःही फिटनेसकडे खूप लक्ष द्यायच्या आणि जान्हवीला देखील फिटनेसची आवड आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Janhvi Kapoor Fitness: डाएटमध्ये लपलंय जान्हवी कपूरच्या फिटनेसचं रहस्य, इतकं साधं की तुम्हीही करू शकता Follow!