ऑक्टोबरमध्ये Bollywood हळहळलं; एकाच महिन्यात 7 सेलिब्रिटींनी घेतला जगाचा निरोप
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
October 2025 Died 7 Actors : ऑक्टोबर महिन्यात 7 अभिनेत्यांनी जगाचा निरोप घेतला. यात 74 वर्षीय सतीश शाह यांच्यापासून ते 35 वर्षीय राजवीर जवंदा यांचा समावेश आहे. त्यामुळे मनोरंजनसृष्टीसाठी हा महिना खूपच धक्कादायक ठरला आहे.
advertisement
1/7

राजवीर जवंदा : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 8 ऑक्टोबर रोजी पंजाबी गायक आणि अभिनेता राजवीर जवंदा यांचे निधन झाले. 35 व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या राजवीर यांचा अपघात झाला होता. त्यानंतर ते अनेक दिवस ICU मध्ये होते. अखेर 21 दिवसांनंतर त्यांचे निधन झाले.
advertisement
2/7
वरिंदर सिंह : राजवीरच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 9 ऑक्टोबरला अभिनेता आणि बॉडीबिल्डर वरिंदर सिंहच्या निधनाची बातमी समोर आली होती. त्याच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. हृदयविकाराच्या झटक्याने वरिंदर सिंहचे निधन झाले होते.
advertisement
3/7
पंकज धीर : महाभारतात कर्ण ही भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचे 15 ऑक्टोबर रोजी निधन झाले होते. कर्करोगाशी त्यांची झुंज अपयशी ठरली होती.
advertisement
4/7
असरानी : ऐन दिवाळीत 20 ऑक्टोबरला सुपरहिट 'शोले' चित्रपटात कर्नची भूमिका साकरणारे दिग्गज अभिनेते असरानी यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनाने बॉलिवूडचा मोठा धक्का बसला होता.
advertisement
5/7
ऋषभ टंडन : अभिनेता आणि गायक ऋषभ टंडन यांचे 22 ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ऋषभच्या पत्नीने एक भावनिक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ऋषभच्या निधनाची बातमी दिली होती.
advertisement
6/7
पीयूष पांडे : अॅडगुरू पीयूष पांडे यांचे 24 ऑक्टोबरला निधन झाले. देशातील अनेक गाजलेल्या जाहिराती पीयूष पांडे यांनी बनवलेल्या आहेत. अमिताभ बच्चनसह अनेक सेलिब्रिटी त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते.
advertisement
7/7
सतीश शाह : साराभाई वर्सेस साराभाई फेम सतीश शाह यांचे 25 ऑक्टोबरला निधन झाले. सतीश शाह हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कॉमेडीयन होते. छोट्या पडद्यावरील अनेक मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांना भरभरून हसवलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ऑक्टोबरमध्ये Bollywood हळहळलं; एकाच महिन्यात 7 सेलिब्रिटींनी घेतला जगाचा निरोप