द फॅमिली मॅनच्या आधीच्या दोन सीझनमधून अभ्नेता राज-डीके, मनोज बाजपेयी, शारीब हाशमी आणि इतर कलाकारांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. सोशल मीडियावरही त्यांची क्रेझ दिसून येत आहे. या सगळ्या कलाकारांना पुन्हा एकदा ओटीटीवर पाहण्यासाठी चाहते सज्ज होते. अखेर चाहत्यांची ही मागणी पूर्ण होणार आहे.
( 14 वर्षांचा संसार, पदरात 3 मुलं, असं काय घडलं ज्यामुळे जय-माहीवर आली डिवोर्सची वेळ? )
advertisement
द फॅमिली मॅन ही एक जासूसी आणि ॲक्शनने भरलेली कथा आहे. यात मनोज बाजपेयी मुख्य भूमिकेत श्रीकांत तिवारी म्हणून दिसतात. त्यांच्या सोबत जयदीप अहलावत, निमरत कौर, शारिब हाशमी, प्रियामणी, अशलेषा ठाकूर, वेदांत सिन्हा, श्रेया धनवंतरी आणि गुल पनाग यांसारखे कलाकारही झळकणार आहेत.
"श्रीकांत तिवारी इज ऑन द वे! द फॅमिली मॅन प्राइमवर येत आहे. उद्या रिलीज डेट आऊट करू", असं म्हणत प्राइम व्हिडीओनं चाहत्यांना मोठी अपडेट दिली आहे. द फॅमिली मॅन 3 कधी रिलीज होणार याची अपडेट उद्याच मिळणार आहे.
या मालिकेची कथा राज, डीके आणि सुमन कुमार यांनी लिहिली आहे, संवाद सुमित अरोरा यांनी दिले आहेत, आणि दिग्दर्शन राज-डीके यांनी केले आहे. या सीझनमध्ये त्यांच्यासोबत सुमन कुमार आणि तुषार सेठही दिग्दर्शक म्हणून सहभागी झाले आहेत.
द फॅमिली मॅन सीझन 3 लवकरच फक्त प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. ही मालिका भारतासह जगभरातील 240 पेक्षा अधिक देश आणि प्रदेशांमध्ये पाहता येणार आहे.
