Cyclone Montha Alert: महाराष्ट्रात 24 तासांमध्ये येणार मोठं संकट, मुसळधार पाऊस कोसळणार, अनेक जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे सक्रिय झाल्यामुळे राज्यात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
1/7

महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अस्मानी संकट असणार आहे. बंगालच्या उपसागरात मोंथा चक्रीवादळ घोंगाव असून पुढील 24 तासांत या चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढणार आहे.
advertisement
2/7
हे चक्रीवादळ 28 ऑक्टोबरला आंध्र प्रदेशची काकीनाडा किनारपट्टी आलोडणार आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे सक्रिय झाल्यामुळे राज्यात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
3/7
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईसह कोकणात पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यावेळी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.
advertisement
4/7
28 ऑक्टोबर रोजी विदर्भ-मराठवाड्यात यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भाच्या आजूबाजूच्या पट्ट्यात रेड अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे.
advertisement
5/7
दक्षिणेकडील राज्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवश ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रात मोंथा चक्रीवादळामुळे पुन्हा एकदा पावसाचं संकट आलं आहे.
advertisement
6/7
तर 29 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा मध्य भारतात आणि महाराष्ट्रात देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात तळ कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राचा काही पट्ट्यात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होणार आहे.
advertisement
7/7
30 ऑक्टोबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Cyclone Montha Alert: महाराष्ट्रात 24 तासांमध्ये येणार मोठं संकट, मुसळधार पाऊस कोसळणार, अनेक जिल्ह्यांना अलर्ट