बायकोच्या परवानगीशिवाय दारू पिणं महागात! नवऱ्यांनो जेलमध्ये जाल; इतक्या वर्षांची शिक्षा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Husband Drink Liquor Without Wife Permission : नवीन वर्षाच्या संदर्भात सोशल मीडियावर विविध व्हिडिओ शेअर केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मद्यपी पतींना नवीन वर्षाबद्दल इशारा देण्यात आला आहे.
advertisement
1/5

थर्टी फर्स्ट किंवा न्यू इअरची पार्टी.... पार्टी म्हणजे अनेकांसाठी दारू... कित्येकांनी यासाठी प्लॅनिंग केली असेल. पण तुमचं लग्न झालं असेल आणि बायको दारू पिण्यासाठी नाही म्हणत असेल, परवानगी देत नसेल तर चुकूनही दारू पिऊ नका. कारण बायकोच्या परवानगीशिवाय दारू पिणाऱ्या नवऱ्यांना जेल होऊ शकते.
advertisement
2/5
एका वकिलाने सोशल मीडियावर याबाबत माहिती देणारा व्हिडीओ पस्ट केला आहे. ज्यात पत्नीच्या परवानगीशिवाय दारू प्यायल्याने नवऱ्याला जेल होऊ शकते, असं सांगण्यात आलं आहे.
advertisement
3/5
माहितीनुसार भारतीय दंड संहिता (BNS) 2023 च्या तरतुदीनुसार 1 जुलै 2024 पासून हा कायदा लागू झाला आहे. हे प्रत्यक्षात जुन्या आयपीसी कलम 498अ चं अपग्रेड केलेलं रूप आहे, जे आता बीएनएसमधील कलम 85 किंवा काही अहवालांमध्ये 85ब अंतर्गत येतं.
advertisement
4/5
या कलमानुसार जर पतीने दारू किंवा कोणतंही मादक पदार्थ सेवन केलं तर पत्नीला शारीरिक किंवा मानसिक क्रूरतेचा सामना करावा लागतो, घरात गोंधळ निर्माण होतो किंवा तिची सुरक्षा, मानसिक शांती किंवा प्रतिष्ठा धोक्यात येते तेव्हा पत्नी त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करू शकते आणि पतीला 3 वर्षांची जेल आणि दंड ठोठावला जाऊ शकतो.
advertisement
5/5
याला पत्नीच्या परवानगीशिवाय मद्यपान करणं असं म्हटलं आहे. उदाहरणार्थ जर पत्नीने पतीला स्पष्टपणे सांगितले की दारू पिऊन घरी येऊ नका कारण त्यामुळे भांडणं किंवा हिंसाचार होतो आणि तरीही पती तसं करत असेल, तर ते क्रूरता मानलं जाईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
बायकोच्या परवानगीशिवाय दारू पिणं महागात! नवऱ्यांनो जेलमध्ये जाल; इतक्या वर्षांची शिक्षा