Singer Geeta Patnaik Death : कार्यक्रमात तब्येत बिघडली आणि प्रसिद्ध गायिकेचा अचानक मृत्यू; गीता पटनायक यांना काय झालं होतं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Singer Geeta Patnaik Passes Away : प्रसिद्ध गायिका एका कार्यक्रमात गेली होती तेव्हा अचानक तिची तब्येत बिघडली आणि रुग्णालयात उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला.
advertisement
1/5

प्रसिद्ध गायिका गीता पटनायक यांचा मृत्यू झाला आहे. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. रविवारी संध्याकाळी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
advertisement
2/5
गीता पटनायक ओडिया संगीतातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध आवाज. गुरुवारी एका कार्यक्रमात असताना त्यांची तब्येत बिघडली.
advertisement
3/5
त्यांना कटकमधील एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण त्यांना वाचवता आलं नाही, उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
advertisement
4/5
टेस्टमध्ये त्यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याचं उघड झालं. उपचारादरम्यान डॉक्टरांनी रविवारी त्यांना ब्रेन डेड घोषित केलं.
advertisement
5/5
त्यांनी अनेक लोकप्रिय ओडिया गाण्यांना आपला आवाज दिला. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक कलाकार आणि संगीतकारांसोबत काम केलं. पण प्रसिद्ध ओडिया गायिका अक्षया मोहंती यांच्यासोबतच्या सहकार्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Singer Geeta Patnaik Death : कार्यक्रमात तब्येत बिघडली आणि प्रसिद्ध गायिकेचा अचानक मृत्यू; गीता पटनायक यांना काय झालं होतं?