लागिरं झालं जी! 'शितली' 'बाई वाड्यावर या' फेम अभिनेत्याच्या प्रेमात; शिवानी बावकर-निखिल वैरागर Girlfriend-Boyfriend
- Published by:Priya Lad
Last Updated:
Girlfriend Boyfriend : व्हॅलेंटाइन डे अर्थात प्रेम दिन सर्व प्रेमिकांसाठी मोठा दिवस असतो. याच प्रेम दिनाच्या मुहुर्तावर शिवानी बावकर आणि निखिल वैराग यांच्या या नात्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे.
advertisement
1/5

'लागिरं झालं जी' मालिकेतून घराघरात पोहोचलेली शितली म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर आता बाई वाड्यावर या गाण्यातील अभिनेता निखिल वैरागरच्या प्रेमात पडली आहे. दोघंही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बनले आहेत. आता शिवानी आणि निखिल यांच्यातील गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं हे नातं म्हणजे रिअल नाही तर रिल आहे. Girlfriend Boyfriend हे नव्या फिल्मचं नाव आहे.
advertisement
2/5
या फिल्ममध्ये शिवानी बावकर, निखिल वैराग यांची मध्यवर्ती भूमिका आहे. याशिवाय सक्षम कुलकर्णी, ऐश्वर्या शिंदे, अक्षय टंकसाळे, किशोर चौघुले, अभय कुलकर्णी, राजश्री पो्हेकर-कुलकर्णी, समृद्धी राज आणि सोमन चौहान अशी उत्तमोत्तम कलाकारांची फळी या चित्रपटात आहेत.
advertisement
3/5
या चित्रपटात प्रेम, मैत्री, भावना आणि अनपेक्षित वळणांनी सजलेली कथा प्रेक्षकांना एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जाणार आहे. आजच्या आधुनिक नात्यांमधील गुंतागुंत, विश्वास, निष्ठा आणि कमिटमेंटचा खरा अर्थ उलगडणारा हा चित्रपट तरुणाईसाठी खास आकर्षण ठरणार आहे.
advertisement
4/5
प्रेम ही संकल्पना अजरामर आहे. अनेक चित्रपटांतून आजवर प्रेम ही संकल्पना, त्याचे वेगवेगळे पदर उलगडण्यात आले आहेत. मात्र काळानुरुप प्रेम या संकल्पनेला नवनवे आयाम मिळतात. त्यामुळे आजच्या एआयच्या काळात Girlfriend Boyfriend चित्रपटातून प्रेमाची आणि तरुणाईची गोष्ट कशा पद्धतीने मांडली जाते याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
advertisement
5/5
शिव लोखंडे आणि ऋतुजा पाटील प्रस्तुतकर्ते असलेल्या या फिल्मची निर्मिती करण के के यांनी केली आहे. सरोज परदेशी, समृद्धी राज, विनोद कांबळे सहनिर्माते आहेत, तर शिवाकांत तिवारी एसोसिएट प्रोड्यूसर आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन रेखा करन यांनी केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
लागिरं झालं जी! 'शितली' 'बाई वाड्यावर या' फेम अभिनेत्याच्या प्रेमात; शिवानी बावकर-निखिल वैरागर Girlfriend-Boyfriend