TRENDING:

Kitchen Tricks : भजी आणि पुऱ्या तळल्यानंतर उरलेल्या तेलाचं काय करावं, कळत नाही? 'या' पद्धतीने करा वापर

Last Updated:
How to use leftover oil again after friyng puri : बऱ्याचदा आपण भजी किंवा पुऱ्या तळतो त्यानंतर तेल उरतं. मात्र या तेलाच काय करावं हे आपल्याला कळत नाही. बरेच लोक म्हणतात एकदा तळण्यासाठी वापरलं गेलेलं तेल परत खाण्यासाठी वापरू नये. पण हे खरंच योग्य आहे का? उरलेल्या तेलाचा कसा वापर करावा? चला जणू घेऊया.
advertisement
1/9
भजी आणि पुऱ्या तळल्यानंतर उरलेल्या तेलाचं काय करावं, कळत नाही? असा करा वापर
पुऱ्या-भजी तळल्यानंतर हमखास तेल उरतच. प्रत्येकवेळी हे तेल फेकून देणंही योगय वाटतं नाही. कारण अर्थातच ते खूप महाग असतं. अशावेळी याचा वापर आपण सांर्त पद्धतीने कास करू शकतो. याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे.
advertisement
2/9
तळल्यानंतर उरलेलं तेल एकदम गरम गरम गाळू नका किंवा डब्यात भरू नका. कारण तेल खूप गरम असताना गाळल्याने ते लवकर खराब होऊ शकते. म्हणून तेल आधी पूर्ण पाने थंड होऊ द्या.
advertisement
3/9
तळल्यानंतर तेलामध्ये बरेच अन्नाचे अवशेष उरलेले असतात. अशावेळी ते तेल योग्यप्रकारे गाळणे आवश्यक असते. कारण हे कण तेलात राहिले तर तेल लवकर खराब होऊ शकते. त्यामुळे एखाद्या बारीक चाळणीने किंवा सुटी कपड्याने हे तेल गाळून घ्या.
advertisement
4/9
गाळलेले तेल नेहमी काचेच्या किंवा स्वच्छ स्टीलच्या डब्यात ठेवा. हा डबा सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा. अन्यथा तेल उष्णतेने आणखी जास्त घट्ट होऊ शकते आणि खराब होऊ शकते.
advertisement
5/9
हे तेल पुन्हा वापरण्यापूर्वी एकदा ते चांगले आहे की नाही हे तपासा. त्याचा वास घेऊन पहा, जर वास विचित्र येत असेल किंवा त्याला दुर्गंधी येत असेल तर ते वापरू नका. तसेच जर तेल खूप काळे किंवा घट्ट झालेले दिसत असेल तर ते त्वरित फेकून द्या.
advertisement
6/9
तेल चांगल्या स्थितीत असेल तर त्याचा वापर तुम्ही फार फार तर आणखी एकदा करू शकता. एकाच तेल दोनपेक्षा जास्तवेळा वापरणे योग्य नाही. तसेच एकदा तळलेले तेल पुन्हा तळण्यासाठी वापरू नका.
advertisement
7/9
हे तेल स्वयंपाकासाठी पुन्हा वापरणे चांगले नसले तरी तुम्ही ते इतर प्रकारेही वापरू शकता. कीटकांना दूर ठेवण्यासाठी फुलांच्या कुंड्यांच्या मातीत थोडेसे हे तेल टाकू शकता. याव्यतिरिक्त लाकडी फर्निचर किंवा लोखंडी वस्तूंना हलके पॉलिश करण्यासाठी देखील थोडेसे हे तेल वापरले जाऊ शकते
advertisement
8/9
लाकडावर हे तेल वापरल्याने त्यांना थोडी चमकही येते. दरवाज्यांमधून जर कर्कश आवाज येत असेल, तर हे तेल तुम्ही वापरू शकता. कापूस तेलात बुडवा आणि दरवाज्यांना लावा. इथे तेल दरवाज्यांमध्ये ग्रीससारखे काम करते. यामुळे दरवाज्यांमधून आवाज येणं कमी होईल.
advertisement
9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Tricks : भजी आणि पुऱ्या तळल्यानंतर उरलेल्या तेलाचं काय करावं, कळत नाही? 'या' पद्धतीने करा वापर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल