प्रेमाचं अंकुर फुलण्याआधीच कोमेजलं! करण घराबाहेर होताच प्राजक्ता कोसळली, बाल्कनीत एकटीच बसून ढसाढसा रडली, PHOTO
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
घरामध्ये गेल्या काही दिवसांपासून करण आणि प्राजक्ताच्या मैत्रीपलीकडच्या नात्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे या एव्हिक्शनचा सर्वात मोठा फटका बसलाय तो म्हणजे प्राजक्ताला.
advertisement
1/7

बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये आजवरचे अनेक विक्रम मोडीत निघाले आहेत, पण आजचा 'भाऊचा धक्का' प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा ठरला. ज्याची भीती वाटत होती, तेच घडलं.
advertisement
2/7
रितेश देशमुखने पाचव्या आठवड्यात डबल एव्हिक्शनचा असा काही बॉम्ब टाकला की, घरातील एक भक्कम गट एका झटक्यात विखुरला गेला. करण सोनावणे आणि आयुष संजीव या दोघांचा प्रवास थांबला आणि घरात उरलेल्या त्यांच्या मित्रांच्या पायाखालची जमीन सरकली.
advertisement
3/7
या एव्हिक्शनचा सर्वात मोठा फटका बसलाय तो म्हणजे प्राजक्ता शुक्रे हिला. घरामध्ये गेल्या काही दिवसांपासून करण आणि प्राजक्ताच्या मैत्रीपलीकडच्या नात्याची चर्चा रंगली होती. अगदी कॅप्टन्सी टास्कमध्येही बोर्डच्या आड लपून चाललेला त्यांचा गुपचूप रोमान्स कॅमेऱ्याने टिपला होता.
advertisement
4/7
करणने एकदा भावूक होऊन प्राजक्ताला म्हटलं होतं, "आयुष्यात मी कधी कोणाशी इतकं कनेक्ट झालो नव्हतो. माझ्या आयुष्याचा बंद असलेला रस्ता तुझ्यामुळे पुन्हा सुरू झालाय."
advertisement
5/7
पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. जेव्हा मुख्य दरवाजा उघडला आणि फक्त सचिन कुमावत घरात परतला, तेव्हा प्राजक्ताचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेनासा झाला. आपला सर्वात जवळचा मित्र आणि आधार असलेला करण आता या खेळात सोबत नाही, हे वास्तव पचवणं तिला कठीण गेलं.
advertisement
6/7
रितेशने जेव्हा करण, सचिन आणि आयुष या तिघांना बेडरूममधील दारातून आत पाठवलं, तेव्हा घरामध्ये स्मशानशांतता पसरली होती. निरोप घेतानाचे ते क्षण अत्यंत हृदयद्रावक होते. सचिन जेव्हा सुरक्षित होऊन घरात आला, तेव्हा तो आनंदी नव्हता तर ढसाढसा रडत होता. सचिनला पाहताच प्राजक्ताने त्याला मिठी मारली आणि दोघंही ओक्साबोक्षी रडू लागले.
advertisement
7/7
करण आणि आयुषच्या जाण्याने प्राजक्ता, सचिन आणि सागर कारंडे यांचा जो भक्कम गट होता, तो आता खिळखिळा झाला आहे. करण हा या ग्रुपचा मास्टरमाईंड आणि आधार होता. त्याच्या जाण्याने प्राजक्ता पूर्णपणे कोलमडली असून ती बाल्कनीमध्ये तासनतास एकटीच रडताना दिसली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
प्रेमाचं अंकुर फुलण्याआधीच कोमेजलं! करण घराबाहेर होताच प्राजक्ता कोसळली, बाल्कनीत एकटीच बसून ढसाढसा रडली, PHOTO