TRENDING:

Guess Who: अफगाणिस्तानी मॉडेल महादेवाची भक्त? मुस्लिम असूनही लावते 'शंकर' आडनाव, खरं प्रेम शोधायला गाठलं भारत

Last Updated:
Afghan model is a devotee of Mahadev: सध्या सोशल मीडियावर एका सुंदरीची चर्चा रंगली आहे, जी स्वतः मुस्लिम असून महादेवाला आपले आराध्य मानते.
advertisement
1/7
अफगाणिस्तानी मॉडेल महादेवाची भक्त? मुस्लिम असूनही लावते 'शंकर' आडनाव
आज महाशिवरात्री आहे. महादेवाच्या भक्तीमध्ये आज असंख्य भाविक न्हाऊन निघाले आहेत. मात्र, सध्या सोशल मीडियावर एका सुंदरीची चर्चा रंगली आहे, जी स्वतः मुस्लिम असून महादेवाला आपले आराध्य मानते.
advertisement
2/7
सोशल मीडियावर सध्या एका अशा सौंदर्याची चर्चा रंगली आहे, जिच्याबद्दल ऐकल्यावर तुम्हीही थक्क व्हाल. सदफ शंकर ही दिसायला अतिशय ग्लॅमरस, पेशाने मॉडेल असून मुळची अफगाणिस्तानची आहे.
advertisement
3/7
पण मुस्लिम धर्मात जन्मलेली ही अफगाणी सुंदरी स्वतःला कट्टर 'शिवभक्त' मानते. इतकंच नाही, तर अफगाणिस्तानातून ही सुंदरी तिचं खरं प्रेम शोधण्यासाठी भारतात आली आहे.
advertisement
4/7
'स्प्लिट्सविला X6' मुळे चर्चेत आलेली सदफ गेल्या १० वर्षांपासून भारतात राहतेय. तिचं भारतावर आणि इथल्या संस्कृतीवर इतकं प्रेम जडलंय की, तिने स्वतःच्या नावासोबत 'शंकर' हे आडनाव जोडलं आहे.
advertisement
5/7
सदफ सांगते की, तिच्या आयुष्यातील प्रत्येक वळणावर तिला महादेवाची सोबत जाणवते. जेव्हा ती हातावर मेहंदी काढते, तेव्हा त्यात नक्षीपेक्षा महादेवाचा त्रिशूळ काढण्याला ती प्राधान्य देते. तिच्या या अढळ श्रद्धेमुळे ती आज सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.
advertisement
6/7
नुकतंच करण कुंद्राशी संवाद साधताना सदफने आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली. ती म्हणाली, "मी भारतात केवळ करिअरसाठी नाही, तर खऱ्या प्रेमाच्या शोधात आले आहे. मला खात्री आहे की, माझा जीवनसाथी कोणीतरी भारतीयच असेल आणि मी इथलीच सून बनेन."
advertisement
7/7
सदफचं आयुष्य विरोधाभासांनी भरलेलं आहे. एका बाजूला तिचे बिकिनीमधील बोल्ड फोटो इंटरनेटचा पारा वाढवतात, तर दुसरीकडे फावल्या वेळेत ती जप आणि पूजा-अर्चा करण्यात मग्न असते. तिच्या मते, शिवभक्तीमुळेच तिच्या आयुष्याची गाडी रुळावर आहे. "माझ्यासाठी धर्म ही वैयक्तिक गोष्ट आहे, पण शिवाबद्दलची माझी निष्ठा ही माझ्या अस्तित्वाचा भाग आहे," असं ती ठामपणे सांगते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Guess Who: अफगाणिस्तानी मॉडेल महादेवाची भक्त? मुस्लिम असूनही लावते 'शंकर' आडनाव, खरं प्रेम शोधायला गाठलं भारत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल