Sachin Pilgaonkar: 'कुणाची हिंमत आहे का?', सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांवर अशोक मामा संतापले, सुनावले खडे बोल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Ashok Saraf got angry at trollers: आपल्या जिवलग मित्रावर होणारी चिखलफेक पाहून आता खुद्द ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ मैदानात उतरले आहेत.
advertisement
1/7

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार, आपल्या अप्रतिम अभिनयाने महाराष्ट्राला हसवणारे सचिन पिळगांवकर त्यांच्या काही विधानांमुळे सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसतात. काहींना त्यांचं बोलणं आवडतं, तर काहीजण त्यांना 'अती शहाणपणा' म्हणत ट्रोल करतात.
advertisement
2/7
पण आपल्या जिवलग मित्रावर होणारी ही चिखलफेक पाहून आता खुद्द ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ मैदानात उतरले आहेत. सचिनच्या ज्ञानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना अशोक सराफ यांनी जे उत्तर दिलंय, ते ऐकून ट्रोलर्सची तोंडं नक्कीच बंद होतील.
advertisement
3/7
एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी सचिन पिळगांवकरांची पाठराखण केली. ते म्हणाले, "जेव्हा मी सचिनला ट्रोल होताना पाहतो, तेव्हा मला खूप वाईट वाटतं. सचिनने आज जे स्थान मिळवलंय, ते काही फुकट किंवा वारशाने मिळालेलं नाही. त्यासाठी त्याने रक्ताचं पाणी केलंय. अगदी लहान वयापासून त्याने दिग्दर्शन केलं, असिस्टंट म्हणून राबला, संगीत दिलं आणि एडिटिंगचं तंत्रही आत्मसात केलं. आज त्याला प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास आहे."
advertisement
4/7
अशोक मामा पुढे म्हणाले, "आता लोक काय बोलतात? तो काय बोलला यावरून त्याला ट्रोल केलं जातंय. त्याच्या ज्ञानावर कुणी एक तरी बोट ठेवून दाखवेल का? कुणाची हिंमत आहे का? कुणीच करू शकत नाही, कारण ट्रोल करणाऱ्यांना हे माहितच नसतं की समोरच्या माणसाने किती मेहनत घेतली आहे. आजकाल ट्रोल करणं हा लोकांचा फावल्या वेळचा छंद झाला आहे."
advertisement
5/7
सचिन पिळगांवकर हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील एक मोठं नाव आहे. पण सोशल मीडियाच्या जमान्यात कुणीही उठतं आणि काहीही कमेंट करतं. यावर भाष्य करताना मामांनी खोचक टोला लगावला. ते म्हणाले, "काही लोक तर टपूनच बसलेले असतात. हा माणूस कुठे काही बोलतोय का? कुठे एखादं वाक्य सापडतंय का? सापडलं की सुरू झाली ट्रोलिंग. पण ही लोकं हे विसरतात की ज्याला ते ट्रोल करत आहेत, त्याच्या पायाच्या नखाचीही सर त्यांना नाहीये."
advertisement
6/7
सचिन पिळगांवकरांच्या या वादात केवळ अशोक सराफच नाही, तर क्रांती रेडकर आणि पुष्कर जोग यांसारख्या कलाकारांनीही आपली मतं मांडली आहेत. "जेव्हा एखादा माणूस खूप यशस्वी होतो, तेव्हा त्याचे पाय ओढणारे अनेक तयार होतात," अशी भावना इंडस्ट्रीतून व्यक्त होत आहे.
advertisement
7/7
खुद्द सचिन पिळगांवकर यांनीही नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांना अशा नकारात्मकतेने काहीही फरक पडत नाही, कारण त्यांचं कामच त्यांचं उत्तर आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sachin Pilgaonkar: 'कुणाची हिंमत आहे का?', सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांवर अशोक मामा संतापले, सुनावले खडे बोल