TRENDING:

Weather Alert: ‘थर्टी फर्स्ट’ला वारं फिरलं, कल्याण-डोंबिवलीला हवामान विभागाचा अलर्ट

Last Updated:
Weather Alert: ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीतील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. 31 डिसेंबरचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
1/5
‘थर्टी फर्स्ट’ला वारं फिरलं, कल्याण-डोंबिवलीला हवामान विभागाचा अलर्ट
उत्तर भारतातील तीव्र थंडीचा प्रभाव महाराष्ट्रावरही जाणवत आहे. वर्षाच्या अखेरीस हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. राज्यातील अनेक भागांत पहाटेची थंडी अधिक बोचरी झाली आहे. तापमानात सातत्याने घट होत असल्याने गारठा वाढला असून ठाणे जिल्ह्यासह कल्याण डोंबिवली, बदलापूर आणि शहापूर, मुरबाडमधील 31 डिसेंबरचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
ठाण्यात पारा घटल्याने गारठा वाढला आहे. तर कल्याणमध्ये देखील 31 डिसेंबरला हुडहुडी जाणवणार आहे. हवामान स्वच्छ आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे. ज्यात कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस पर्यंत असेल. पुढील काही दिवस कल्याणध्ये हवामानाची हीच स्थिती राहील.
advertisement
3/5
डोंबिवली शहरात 31 डिसेंबरला थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. किमान तापमान 15 अंश तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे. वर्षअखेरीस 'गुलाबी थंडी' अनुभवता येईल, पण धुक्यामुळे वाहन चालवताना काळजी घ्यावी लागेल.
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात हवामान खात्याच्या अंदाजानुसार थंडीची लाट सुरूच राहू शकते. ज्यामुळे कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान आल्हाददायक आणि काहीसे थंड असेल. परंतु, दिवसा उन्हाची तीव्रता जाणवेल.
advertisement
5/5
बदलापूर शहरात 31 डिसेंबरला हवामान स्वच्छ, कोरडे आणि थंड राहण्याची शक्यता आहे. गेल्या 2 दिवसांपासून हवामानाची हीच स्थिती कायम राहील. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमानात 15 अंश सेल्सिअस असल्याने दिवसा ऊन व हलकी उष्णता जाणवेल. तर मुरबाड, शहापूर तालुक्यात कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 20 अंश सेल्सिअस असेल. 31 डिसेंबरला गारठा वाढणार असल्याने नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: ‘थर्टी फर्स्ट’ला वारं फिरलं, कल्याण-डोंबिवलीला हवामान विभागाचा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल