TRENDING:

पुण्याच्या IT पार्कमध्ये नोकरी, 'जमतारा 2' फेम अभिनेत्यानं उचललं टोकाचं पाऊल; 25व्या वर्षी संपवलं आयुष्य

Last Updated:
Marathi Actor Death : प्रसिद्ध मराठी अभिनेत्यानं वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी टोकाचं पाऊल उचललं. राहत्या घरी त्याने आयुष्य संपवलं. त्याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येतेय.
advertisement
1/7
'जमतारा 2' फेम अभिनेत्यानं उचललं टोकाचं पाऊल; 25व्या वर्षी संपवलं आयुष्य
साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनं सगळेच हादरलेत. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. अशातच मराठी मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आहे.
advertisement
2/7
'जमतारा सीझन 2' या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेतचा सचिन चांदवडे यानं आत्महत्या करत आयुष्य संपवलं आहे. वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी त्याने इतकं टोकाचं पाऊल उचललं.
advertisement
3/7
सचिन चांदवडे हा पुणे आयटी पार्कमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील उंदिरखेडे हे त्याचं मुळ गाव आहे.
advertisement
4/7
सचिनला अभिनयाची आवड होती. आयटीची नोकरी सांभाळत तो अभिनय देखील करत होता. 'जमतारा सीझन 2' मध्ये त्याने काम केलं होतं. पुण्यातील कलावंत ढोल ताशा पथकाचा तो सदस्य होता.
advertisement
5/7
सचिनचा 'अनुरवन' हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. पाच दिवसांआधीच त्याने सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं होतं.
advertisement
6/7
सचिनने त्याच्या राहत्या घरी पंख्याला लटकून आत्महत्या केली. त्याच्या कुटुंबीयांच्या समजल्यानंतर त्यांनी त्याला रुग्णालयात नेलं. त्याची प्रकृती आणखी खालावली त्यामुळे त्याला धुळ्याला हलवण्यात आलं.
advertisement
7/7
अखेर 24 ऑक्टोबर रोजी रात्री दीड वाजता त्याचा मृत्यू झाला. सचिनच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. त्याच्या जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात येतेय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पुण्याच्या IT पार्कमध्ये नोकरी, 'जमतारा 2' फेम अभिनेत्यानं उचललं टोकाचं पाऊल; 25व्या वर्षी संपवलं आयुष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल