TRENDING:

Numerology: या जन्मतारखांच्या मुलींची 'अधुरी' राहते प्रेम कहाणी! पण जिथं जातात तिथं नाव कमावतात

Last Updated:
Mulank 2 Personality: तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 2 असेल. ही संख्या चंद्राच्या प्रभावाखाली असते, ती कोमलता, संवेदनशीलता आणि भावनात्मकतेचे प्रतीक आहे. मूलांक 2 असलेल्या महिलांचा स्वभाव देखील चंद्रासारखा बदलणारा आणि भावनिक असतो.
advertisement
1/7
या जन्मतारखांच्या मुलींची 'अधुरी' राहते प्रेम कहाणी! जिथं जातात तिथं नाव कमावतात
या महिलांचा स्वभाव आनंदी आणि मिलनसार असतो, पण कधीकधी छोट्या छोट्या गोष्टींवरून भावनिक होतात. अंकशास्त्रज्ञ रवी पराशर यांनी 2 मूलांकाच्या महिलांच्या स्वभावाबद्दल आणि जीवनशैलीबद्दल सविस्तरपणे सांगितले आहे.
advertisement
2/7
व्यक्तिमत्व आणि सवयी-  मूलांक 2 असलेल्या महिला शांत स्वभावाच्या असतात, प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार करतात. त्या जलद निर्णय घेत नाहीत, परिस्थितीचे मूल्यांकन केल्यानंतरच प्रतिक्रिया देतात. त्यांना त्यांच्या कुटुंबाशी खूप प्रेम असते, विशेषतः आईशी मोकळेपणाने बोलतात. त्या वडिलांबद्दल आणि पतीबद्दल थोड्या संकोची असतात. त्यांच्या मनात अनेक नवीन कल्पना आणि स्वप्ने असतात, पण त्यांना पूर्ण करण्यात अडचणी येऊ शकतात.
advertisement
3/7
खर्चाचा ताळमेळ - या महिला पैसा मिळवतात, पण त्यांना बचत करायला जमत नाही. पैसे मिळताच त्या कुटुंबियांच्या गरजा पूर्ण करतात किंवा स्वतःसाठी काहीतरी खरेदी करतात. त्यांना पैसे व्यवस्थित वाचवण्याची सवय नसते.
advertisement
4/7
स्वभाव -  मूलांक 2 असलेल्या महिला खूप भावनिक आणि संवेदनशील असतात. त्या इतरांच्या भावना समजून घेतात आणि त्यांच्याशी सहानुभूती दाखवतात. त्या नेहमी इतरांना मदत करण्यास तयार असतात.
advertisement
5/7
प्रेम आणि वैवाहिक जीवन - मूलांक 2 असलेल्या महिला प्रेमात खूप भावनिक असतात, पण आपल्या भावना उघडपणे व्यक्त करण्यास कचरतात. शक्यतो या मूलांकाच्या मुलींची प्रेम कहाणी 'अधुरी' राहते, कारण त्या स्वाभिमानाला आणि कौटुंबिक प्रतिष्ठेला जास्त महत्त्व देतात. लग्नाच्या बाबतीत त्या घाईघाईने निर्णय घेत नाहीत, पण एकदा नाते निश्चित झाल्यावर त्या पूर्ण निष्ठेने पती आणि कुटुंबाशी समर्पित राहतात. लग्नानंतर त्या पतीची विशेष काळजी घेतात आणि सुख-दु:ख वाटून घेतात.
advertisement
6/7
चांगला जोडीदार - मूलांक 2 च्या महिला खूप रोमँटिक आणि समर्पित असतात. त्या त्यांच्या जोडीदाराशी भावनिकरित्या जोडल्या जातात. कोमलता आणि प्रेमळ वागणूक त्यांना एक आदर्श जोडीदार बनवते. या मूलांकाच्या महिला कला, लेखन, शिक्षण, समाजसेवा, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात चांगले काम करू शकतात.
advertisement
7/7
या गोष्टींची काळजी घ्यावी -भावनिक संतुलन: तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास आणि आत्मविश्वास राखण्यास शिका.स्वावलंबन: तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करा.ध्यान आणि योग: मानसिक शांतीसाठी तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ध्यान आणि योगाचा समावेश करा.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology: या जन्मतारखांच्या मुलींची 'अधुरी' राहते प्रेम कहाणी! पण जिथं जातात तिथं नाव कमावतात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल