Astro Tips 2026: नवीन सालात तरी इच्छापूर्ती होणार का? लक लागण्यासाठी राशीनुसार या गोष्टी करा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astro Tips 2026: नवीन वर्षात काही तरी चांगलं व्हावं, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या काळात राशीनुसार काही विशिष्ट दानधर्म आणि मंत्रजप केल्यास जीवन अधिक सुखकर आणि मंगलमय होऊ शकते. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीसाठी काही खास उपाय सुचवण्यात आले आहेत.
advertisement
1/6

मेष राशीच्या व्यक्तींनी नवीन वर्षाची सुरुवात गाजर, डाळिंब किंवा लाल रंगाच्या वस्त्रांचे दान करून करावी. यामुळे भाग्याची साथ मिळेल. तुमच्यासाठी 'ओम हं हनुमते नमः' या मंत्राचा जप करणे अत्यंत फायदेशीर ठरेल.वृषभ राशीच्या लोकांनी लक्ष्मी मातेची पूजा करावी आणि सकाळी गाईला गूळ व पोळी खाऊ घालावी. यामुळे घरात सुख-शांती नांदेल आणि धनलाभ होईल. लक्ष्मी मातेच्या कृपेसाठी 'ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः' मंत्राचा जप करावा.
advertisement
2/6
मिथुन राशीच्या लोकांनी देवाला पांढरी फुले अर्पण करावीत आणि अन्नदान करावे. हा उपाय भाग्याला प्रबळ करतो आणि जीवनात सकारात्मक बदल घडवतो. श्री गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी 'ओम गं गणपतये नमः' मंत्राचा जप करावा.कर्क राशीच्या लोकांनी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करून गणपतीला दुर्वा अर्पण कराव्यात. हा उपाय विवाह संबंधी अडथळे दूर करण्यास मदत करतो. भगवान शिवाच्या कृपेसाठी 'ओम नमः शिवाय' मंत्राचा जप नक्की करावा.
advertisement
3/6
सिंह राशीच्या व्यक्तींनी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे आणि त्यांच्या नावांचे स्मरण करावे. यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात उत्साह टिकून राहतो. तुमच्यासाठी 'ॐ सूर्याय नमः' हा मंत्र अत्यंत लाभदायी आहे.कन्या राशीच्या लोकांनी हिरव्या मुगाचे दान करावे आणि संध्याकाळी गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवावा. हा उपाय नोकरी, व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनात आनंद देणारा आहे. तुम्हाला 'ओम गं गणपतये नमः' मंत्राचा जप करणे फलदायी ठरेल.
advertisement
4/6
तूळ राशीच्या लोकांनी लक्ष्मी मातेचे पूजन करून देवीला फुले आणि पांढरी मिठाई अर्पण करावी. यामुळे वर्षभर सकारात्मक ऊर्जा टिकून राहील. शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी 'ओम शुं शुक्राय नमः' मंत्राचा जप करावा.वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी हनुमानाची पूजा करावी, शेंदूर अर्पण करावा आणि हनुमान चालीसाचे पठण करावे. नशिबाची साथ मिळवण्यासाठी 'ओम अं अंगारकाय नमः' या मंत्राचा जप करणे लाभदायक ठरेल.
advertisement
5/6
धनु राशीच्या लोकांनी भगवान विष्णूंची पूजा करून केशरयुक्त खिरीचा नैवेद्य दाखवावा. पिवळ्या रंगाच्या अन्नाचे दान करणे तुमच्यासाठी शुभ आहे. विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी 'ओम नमो भगवते वासुदेवाय' मंत्राचा जप करावा.मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी शनिदेवाच्या मंदिरात तेल अर्पण करावे आणि शनि चालीसाचे पठण करावे. यामुळे दोष आणि समस्यांपासून मुक्ती मिळते. 'ओम शं शनैश्चराय नमः' मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी लाभदायक आहे.
advertisement
6/6
मीन राशीच्या व्यक्तींनी पांढरी वस्त्रे आणि अन्नाचे दान करावे. गाईला पोळी खाऊ घालावी. हा उपाय आध्यात्मिक आणि भावनिक सुख वाढवणारा आहे. भगवान विष्णूंच्या आशीर्वादासाठी 'ओम नमो नारायणाय' मंत्राचा जप करावा.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astro Tips 2026: नवीन सालात तरी इच्छापूर्ती होणार का? लक लागण्यासाठी राशीनुसार या गोष्टी करा