TRENDING:

Astrology: कुंभ, मीन, मेष राशींवरील संकटे कधी टळणार? साडेसाती सुरू असल्यानं इतक्यात सुटका नाही

Last Updated:
Shani Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार शनि हा एक महत्त्वाचा ग्रह आहे. त्याला कर्मफळदाता किंवा न्यायदेवता असेही म्हणतात. कारण तो व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. शनीच्या शुभ प्रभावाने व्यक्तीला यश, मान-सन्मान आणि समृद्धी मिळते, तर अशुभ प्रभावामुळे संघर्ष आणि अडचणी येतात. शनिची साडेसाती अनेकांना त्रासदायक काळ ठरते. खरंतर साडेसातीमध्ये लोकांना वास्तवाची जाणीव होते, असेही सांगितले जाते.
advertisement
1/4
कुंभ मीन मेष राशींवरील संकटे कधी टळणार? साडेसाती सुरू असल्यानं सुटका नाहीच
जेव्हा शनि ग्रह एखाद्या व्यक्तीच्या चंद्र राशीच्या १२ व्या, पहिल्या आणि दुसऱ्या घरातून भ्रमण करतो, तेव्हा त्या साडेसात वर्षांच्या कालावधीला साडेसाती म्हणतात. हा कालावधी अडीच वर्षांच्या तीन टप्प्यांमध्ये विभागलेला असतो. राशीच्या शनी १२ व्या घरातून जातो. या काळात आर्थिक अडचणी, आरोग्याच्या समस्या किंवा अनावश्यक खर्च वाढू शकतात.
advertisement
2/4
दुसरा टप्पा: शनि थेट तुमच्या राशीतून जातो. हा साडेसातीचा सर्वात कठीण काळ मानला जातो, त्यावेळी मानसिक तणाव आणि वैयक्तिक आयुष्यात मोठे बदल घडू शकतात. तिसऱ्या टप्प्यात शनि दुसऱ्या घरातून जातो. या टप्प्यात संघर्ष कमी होतो, पण आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. हा टप्पा साडेसातीमधून बाहेर पडण्याचा मार्ग असतो.
advertisement
3/4
सध्या २०२५ मध्ये शनी ग्रह मीन राशीत आहे, त्यामुळे खालील राशींवर साडेसाती सुरू आहे. कुंभ रास: या राशीवर साडेसातीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा सुरू आहे. हा काळ फेब्रुवारी २०२८ मध्ये समाप्त होईल. मीन रास: या राशीवर साडेसातीचा मधला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा सुरू आहे. मेष रास: या राशीवर साडेसातीचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. ही साडेसाती मार्च २०२५ मध्ये सुरू झाली.
advertisement
4/4
शनिची अडीचकी कोणत्या राशींवर? - शनिदोष वेगवेगळ्या प्रकारचे असतात साडेसातीव्यतिरिक्त, शनि जेव्हा एखाद्या राशीच्या चौथ्या किंवा आठव्या घरातून जातो, तेव्हा त्या २.५ वर्षांच्या कालावधीला अडीचकी म्हणतात. सध्या २०२५ मध्ये सिंह आणि धनु राशीवर शनिची अडीचकी सुरू आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: कुंभ, मीन, मेष राशींवरील संकटे कधी टळणार? साडेसाती सुरू असल्यानं इतक्यात सुटका नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल