गणेश मंत्रांच्या जपाचे फायदे आणि नियमांचे पालन केल्याने व्यक्ती आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि यश प्राप्त करू शकते. मार्गशीर्ष संकष्टीनिमित्त गणेश मंत्राविषयी अधिक माहिती ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी दिली आहे.
संकष्टी चतुर्थी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस गणपती बाप्पाला समर्पित आहे. गणपती हा विघ्नहर्ता, म्हणजेच सर्व अडथळे दूर करणारा देव मानला जातो. संकष्टी चतुर्थीला उपवास करून गणपतीची पूजा केल्यास आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात, अशी हिंदू धर्मात दृढ श्रद्धा आहे.
advertisement
संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने अनेक फायदे मिळतात, असे मानले जाते. गणपतीला विघ्नहर्ता म्हणतात. कोणताही शुभकार्य सुरू करण्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते. संकष्टीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यास आयुष्यातील अडचणी, दु:ख आणि अडथळे दूर होतात, असे मानले जाते. जे भक्त पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने हा उपवास करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, असे मानले जाते. हा उपवास केल्याने चांगले आरोग्य लाभते, असेही काही भक्त मानतात. हा उपवास केल्याने शरीर आणि मन शुद्ध होते, अशी त्यांची धारणा आहे. संकष्टीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांतता नांदते, अशी लोकांची श्रद्धा आहे.
श्रीगणेशाच्या मंत्राचा जप करण्याची योग्य पद्धत -
1. सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. स्वच्छ आणि शांत ठिकाणी बसा.
2. हातात पाणी घेऊन मंत्राचा जप करण्याची प्रतिज्ञा घ्या.
3. श्रीगणेशाच्या मंत्रांचा जप सुरू करा.
4. मंत्राचा जप करताना मन एकाग्र ठेवा.
5. नामजप केल्यावर हातातील पाणी जमिनीवर सोडा.
सुखाची आस पूर्ण होणार! नवरात्रात शुभ योग जुळल्यानं 4 राशींना पैशांसह खुशखबर
श्रीगणेशाच्या मंत्राचा जप करण्याचे फायदे -
1. जे लोक श्री गणेशाच्या मंत्रांचा जप करतात त्यांना आध्यात्मिक आणि मानसिक शांती प्राप्त होते.
2. त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि यश मिळते.
3. श्रीगणेशाच्या मंत्रांचा जप केल्याने बाप्पाच्या कृपेने माणसाला ज्ञान आणि बुद्धी प्राप्त होते.
4. याशिवाय मंत्रांचा जप केल्याने व्यक्तीचे मन आणि आत्मा शुद्ध होतो.
श्री गणेश मंत्र -
– ॐ गणेशाय नमः
– ॐ गणपतये नमः
– ॐ श्री गणेशाय नमः
– ॐ गणेश शरणम्
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी! श्री गणेश आणि पूर्वजांच्या एकत्र कृपेची संधी
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)