TRENDING:

Shani-Surya Yuti 2026: बॅडलक संपणार! मार्चच्या सुरुवातीलाच मीन राशीत शनि-सूर्याची युती, या राशींना दुहेरी फायदा

Last Updated:
Shani Surya Yuti 2026: ज्योतिषशास्त्रानुसार काही ठराविक काळानंतर ग्रह संयोग जुळून येतात. शनि आणि सूर्य एकाच राशीत एकत्र येण्याच्या स्थितीला विशेष महत्त्व आहे. शनीला कर्माचा कारक तर सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक मानलं जातं, त्यामुळे या दोन ग्रहांची युती मोठी खळबळ उडवून देऊ शकते.
advertisement
1/6
बॅडलक संपणार! मार्चच्या सुरुवातीलाच शनि-सूर्याची महायुती, या राशींना दुहेरी लाभ
मराठी पंचांगानुसार 14 मार्च 2026 रोजी रात्री साधारण 8 वाजून 38 मिनिटांनी सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. तिथे आधीपासूनच शनी असल्यामुळे या दोघांची युती होईल. मीन राशीचा स्वामी गुरु असल्यामुळे हा संयोग काही राशींसाठी सुवर्णकाळ घेऊन येईल.
advertisement
2/6
वृषभ - सूर्य आणि शनीची ही युती तुमच्या नशिबाला चांगलीच साथ देणारी ठरेल. तुम्ही पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून आता चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे आणि रखडलेली कामं हळूहळू पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टाचं कौतुक होईल, ज्यामुळे तुमचा मान-सन्मान वाढेल.
advertisement
3/6
वृषभ - ऑफिसमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्या भविष्यात फायदेशीर ठरतील. आर्थिक स्थिती सुधारेल आणि बचत करण्याची संधीही मिळेल. कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळाल्याने घरातील वातावरण शांत आणि आनंदी राहील. आरोग्याची स्थिती चांगली असेल, फक्त वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप घेण्याकडे लक्ष द्या.
advertisement
4/6
तूळ - तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ अनेक बाबतीत शुभ ठरणार आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू आधीपेक्षा जास्त मजबूत होईल. करिअरमध्ये प्रगती करण्याच्या संधी मिळतील आणि नोकरीत प्रमोशन किंवा नवी मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. परदेश प्रवास किंवा एखाद्या मोठ्या प्रोजेक्टशी जोडले जाण्याची संधी मिळू शकते.
advertisement
5/6
तूळ - वैवाहिक आयुष्यात गोडवा वाढेल आणि जोडीदाराची चांगली साथ मिळेल. कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल आणि घरात एखादं शुभ कार्य ठरण्याची शक्यता आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्ही महत्त्वाचे निर्णय ठामपणे घेऊ शकाल.
advertisement
6/6
कुंभ - कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ सकारात्मक बदल घेऊन येईल. कामाप्रती तुमची एकाग्रता वाढेल आणि तुम्ही तुमच्या ध्येयाबद्दल अधिक गंभीर व्हाल. ऑफिस किंवा व्यवसायात तुम्ही घेतलेली मेहनत फळाला येईल आणि नवीन संधी उपलब्ध होतील. तुमचा आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्ही नवीन आव्हानांना सहज सामोरे जाऊ शकाल. आर्थिक परिस्थिती संतुलित राहील, तरीही खर्चावर थोडं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. धार्मिक किंवा आध्यात्मिक कामांत तुमची रुची वाढेल, ज्यामुळे मनाला शांती मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्यामुळे नाती घट्ट होतील, फक्त विनाकारण ताण घेऊ नका आणि मन शांत ठेवा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Shani-Surya Yuti 2026: बॅडलक संपणार! मार्चच्या सुरुवातीलाच मीन राशीत शनि-सूर्याची युती, या राशींना दुहेरी फायदा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल