Dhan Yog 2026: आनंदवार्ता! रथसप्तमीला देवी लक्ष्मीची कृपा 5 राशींवर; धनयोग जुळल्याचा जबरदस्त लाभ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
RathSaptami Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती आणि तयार होणारे शुभ योग मानवी जीवनावर मोठा प्रभाव टाकतात. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रविवारी अनेक शुभ योग जुळून येत आहेत. आज रथसप्तमी आहे हे विशेष ज्यामुळे लक्ष्मीची विशेष कृपा राहणार आहे.
advertisement
1/6

रथसप्तमी दिवशी चंद्राचे संक्रमण मीन राशीतून मेष राशीत होईल, ज्यामुळे दुसऱ्या भावात शुभलक्ष्मी योग तयार होत आहे. तसेच चंद्रावर मंगळाची दृष्टी आणि मकर राशीत सूर्याची उपस्थिती यामुळे बुधादित्य योगाचा प्रभावही राहील. या शुभ संयोगांमुळे काही राशींसाठी अर्थ, करिअर आणि मान-सन्मानाचे नवीन मार्ग मिळू शकतात.
advertisement
2/6
मेष राशीच्या लोकांसाठी हा दिवस आर्थिकदृष्ट्या खूप शुभ असेल. उत्पन्नाशी संबंधित कामात लाभ मिळेल आणि तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. व्यापाऱ्यांना एखाद्या मोठ्या करारातून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल आणि पगारवाढीची आनंदाची बातमी देखील मिळू शकते.
advertisement
3/6
कर्क राशीच्या लोकांसाठी पैशांच्या बाबतीत हा दिवस उत्तम राहील. जर तुम्ही एखाद्या योजनेवर काम करत असाल, तर त्यात तुम्हाला यश मिळेल. अचानक धनलाभाचे प्रबळ योग तयार होत आहेत. यासोबतच प्रवासाचे संकेत असून तो प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
advertisement
4/6
सिंह राशीच्या लोकांची बऱ्याच काळापासून रखडलेली कामे आता मार्गी लागतील. परदेशाशी संबंधित व्यवसायातून लाभ मिळण्याचे संकेत आहेत. मालमत्तेशी संबंधित व्यवहारातून चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक भक्कम होईल.
advertisement
5/6
धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल आहे. परदेशाशी संबंधित कामात यश मिळेल. स्वतःचे घर किंवा वाहन खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. प्रेमसंबंधांसाठी वेळ चांगला असून नात्यात अधिक दृढता येईल.
advertisement
6/6
मकर राशीच्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टीने हा काळ खूप शुभ आहे. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य लाभेल. वैवाहिक जीवन सुखी राहील आणि एखाद्या छोट्या सहलीचे योग देखील जुळून येतील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Dhan Yog 2026: आनंदवार्ता! रथसप्तमीला देवी लक्ष्मीची कृपा 5 राशींवर; धनयोग जुळल्याचा जबरदस्त लाभ