TRENDING:

Guru-Shukra: गुरूचा महिमा, शुक्राचा पैसा! 5 जूनपासून या राशींवर डबल कृपादृष्टी; डंका वाजणार

Last Updated:
Astrology Guru Effect: गुरू आणि शुक्राची स्थिती जून महिन्यात अनेक राशींसाठी वरदान ठरण्याची शक्यता आहे. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात या दोन ग्रहांच्या स्थितीचा राशींवर चांगला परिणाम दिसून येईल. 5 जून 2025 रोजी शुक्र आणि गुरु एकमेकांच्या 60 अंशांच्या कोनीय स्थितीत असतील.
advertisement
1/5
गुरूचा महिमा, शुक्राचा पैसा! 5 जूनपासून या राशींवर डबल कृपादृष्टी; डंका वाजणार
या दोन ग्रहांच्या या स्थितीमुळे शुभ योग, नफा दृष्टी योग तयार होईल. या स्थितीत काही राशीच्या लोकांचे चमकेल, फायदे मिळू शकतात. शेजारी ग्रहांच्या स्थितीमुळे राशींना अनपेक्षित लाभाचे योग जुळतील. या भाग्यवान राशीची कोणत्या आहेत जाणून घेऊया.
advertisement
2/5
धनु राशी - गुरु आणि शुक्राची ही स्थिती आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. नोकरीमध्ये पदोन्नतीची आणि व्यवसायात नफा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये यश मिळेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठीही ही वेळ चांगली आहे.
advertisement
3/5
धनु राशीच्या लोकांचे या कालावधीत कोठे तरी अडकलेले पैसे परत मिळू शकतात, पैसा विविध मार्गांनी खिशात येईल. उच्च शिक्षण किंवा परदेशाशी संबंधित कामात प्रगतीची संकेत आहेत. आपल्या इच्छा पूर्ण होतील. आपण पैसे वाचविण्यातही यशस्वी व्हाल.
advertisement
4/5
कुंभ - गुरु आणि शुक्राची स्थिती कुंभ राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरू शकते. कामात उत्साह, तेज प्रचंड असेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील. आत्मविश्वास वाढेल, मते प्रभावीपणे सादर करण्याची क्षमता वाढेल. बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते. नोकरी असलेल्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. वाढ आणि पदोन्नती मिळू शकते.
advertisement
5/5
तूळ - गुरू आणि शुक्राच्या स्थितीचे चांगले परिणाम तूळ राशीच्या लोकांना मिळू शकतात. आपल्याला व्यवसायात भागीदारीचा फायदा होईल. सामाजिक गोष्टींमध्ये सहभाग वाढेल. या काळात आपल्याला स्पर्धा आणि करिअरमध्ये यश मिळेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक गोष्टींवर वेळ काढाल त्यामुळे आपल्याला आराम मिळेल. आपण परदेशात प्रवास करू शकता. आपण यावेळी वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Guru-Shukra: गुरूचा महिमा, शुक्राचा पैसा! 5 जूनपासून या राशींवर डबल कृपादृष्टी; डंका वाजणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल