उरले फक्त 48 तास! पुढचे 39 दिवस ठरणार भारी, 'या' राशींवर येणार मोठं संकट; तुमची रास नाही ना यात?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
13 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजून 38 मिनिटांपासून पुढचे 39 दिवस काही विशिष्ट राशींसाठी आव्हानात्मक ठरणार आहेत. या काळात या राशीच्या लोकांना सावध राहावं लागणार आहे.
advertisement
1/5

ज्योतिषशास्त्रानुसार 13 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजून 38 मिनिटांनी न्यायदेवता आणि कर्मफळदाता शनी देव मीन राशीत अस्त होत आहेत. जेव्हा शनी सूर्याच्या अगदी जवळ येतो, तेव्हा त्याचे तेज कमी होऊन तो शक्तीहीन मानला जातो. शनी या अवस्थेत पुढील 39 दिवस राहणार आहे.
advertisement
2/5
शनीचा हा अस्त तीन राशींसाठी आव्हानात्मक ठरू शकतो. या काळात नशिबाची साथ कमी आणि संघर्षाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता असल्याने 'सावधान' राहणे गरजेचे आहे.
advertisement
3/5
कन्या - भागीदारी आणि आरोग्यात अडथळे: कन्या राशीच्या सातव्या भावात शनी अस्त होत आहे. यामुळे वैवाहिक आयुष्यात जोडीदाराशी विनाकारण वाद होऊ शकतात. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच, पायांचे दुखणे किंवा मानसिक तणावामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. या काळात कोणताही मोठा व्यावसायिक निर्णय घेणे टाळा.
advertisement
4/5
सिंह - कामात विलंब आणि गुप्त चिंता: तुमच्या आठव्या भावात शनीचा अस्त होत आहे. हे स्थान संकटांचे मानले जाते. यामुळे तुमच्या ठरलेल्या कामांमध्ये अचानक अडथळे येतील. नोकरीमध्ये वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. गुप्त शत्रू सक्रिय राहतील, त्यामुळे स्वतःच्या योजना कोणाशीही शेअर करू नका. वाहन चालवताना अत्यंत सावधगिरी बाळगा.
advertisement
5/5
मकर - आत्मविश्वासात कमतरता: मकर राशीचा स्वामी शनी स्वतः अस्त होत असल्याने या जातकांना ऊर्जेची कमतरता भासू शकते. निर्णय घेताना गोंधळ होईल आणि कामाचा उत्साह कमी राहील. आर्थिक बाबतीत हा काळ 'थांबा आणि पहा' असा आहे. गुंतवणुकीतून त्वरित परतावा मिळण्याची अपेक्षा करू नका. भावंडांशी असलेल्या संबंधात दुरावा येण्याची शक्यता आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
उरले फक्त 48 तास! पुढचे 39 दिवस ठरणार भारी, 'या' राशींवर येणार मोठं संकट; तुमची रास नाही ना यात?