Astrology: शुक्रवारचा दिवस कोणासाठी लकी-अनलकी? मेष ते मीन 12 राशींचे दैनिक राशीफळ
- Written by:Chirag Daruwalla
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Daily Horoscope, Aajche Rashi Bhavishya, December 26, 2025 By Chirag Daruwalla: ग्रहांची गती आणि नक्षत्रांची स्थिती यांच्या आधारे सर्व राशींचं दैनिक राशीभविष्य सांगितलं जातं. ग्रहस्थितीनुसार राशींवर कसा परिणाम असेल, ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून ते जाणून घेऊ या.
advertisement
1/12

मेष -आजचा दिवस मेष राशीसाठी खूप सकारात्मक आणि उत्साही आहे. तुमचा आत्मविश्वास आज चांगलाच वाढलेला असेल आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्ही जोमाने कराल. मनातले विचार आणि भावना मोकळेपणाने व्यक्त करण्यासाठी हा योग्य काळ आहे. लोकांशी तुमचा संवाद चांगला होईल आणि त्यामुळे वैयक्तिक नाती अधिक घट्ट होतील. कामाकडे नव्या दृष्टीने पाहाल आणि जे काही कराल त्यात तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. आज सामाजिक आयुष्य सक्रिय राहील, नवीन ओळखी होतील आणि मैत्री वाढेल. कोणतेही आव्हान आत्मविश्वासाने आणि संयमाने पेलाल. स्वतःच्या भावनांबरोबरच इतरांच्या भावनांचाही आदर ठेवा. एकंदरीत आजचा दिवस सुसंवाद आणि सकारात्मकतेने भरलेला असेल.लकी अंक: 6लकी रंग: पिवळा
advertisement
2/12
वृषभ -वृषभ राशीसाठी आजचा दिवस आनंददायी आणि सकारात्मक आहे. आज तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांशी अधिक जवळीक साधाल. मन प्रसन्न राहील आणि प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची इच्छा होईल. मित्र आणि कुटुंबासोबत गप्पा, हास्य आणि संवाद याचा आनंद मिळेल. तुमचा शांत आणि समजूतदार स्वभाव नात्यांमध्ये गोडवा आणेल. जुने मतभेद किंवा गैरसमज मिटवायचे असतील तर आजचा दिवस त्यासाठी चांगला आहे. सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यासाठी आजचा दिवस समाधान देणारा ठरेल.लकी अंक: 2लकी रंग: गुलाबी
advertisement
3/12
मिथुन -मिथुन राशीसाठी आजचा दिवस थोडा आव्हानात्मक असू शकतो. मनात अस्थिरता जाणवू शकते आणि त्यामुळे नात्यांमध्ये ताण निर्माण होऊ शकतो. मात्र संवाद साधला तर बराच प्रश्न सुटू शकतो. मनातले विचार आणि भावना प्रियजनांशी मोकळेपणाने बोला. विचार आणि भावना यांचा समतोल राखणे आज कठीण जाऊ शकते, पण याकडे शिकण्याची संधी म्हणून पाहा. थोडा संयम ठेवा आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. आजच्या अडचणी तुम्हाला अधिक मजबूत बनवतील.लकी अंक: 5लकी रंग: नारंगी
advertisement
4/12
कर्क -आज तुम्हाला थोडे अस्वस्थ वाटू शकते. मनात चिंता आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. याचा परिणाम तुमच्या नात्यांवरही होऊ शकतो, विशेषतः तुम्ही भावना व्यक्त न केल्यास. आज मनातल्या गोष्टी बोलून दाखवणं थोडं कठीण जाईल, पण तरीही प्रेम आणि आपुलकी जपण्याचा प्रयत्न करा. स्वतःवर लक्ष केंद्रित करा आणि आपल्या भावना स्वीकारा. दिवस थोडा गोंधळाचा असला तरी हा काळ तात्पुरता आहे. संयम ठेवलात तर लवकरच गोष्टी सुधारतील.लकी अंक: 10लकी रंग: निळा
advertisement
5/12
सिंह -सिंह राशीसाठी आजचा दिवस खूप छान आहे. आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा आज भरपूर प्रमाणात जाणवेल. तुमचा उत्साह आजूबाजूच्या लोकांवरही चांगला परिणाम करेल. नात्यांमध्ये सुसंवाद आणि समजूतदारपणा राहील. प्रियजनांसोबत घालवलेला वेळ आनंद देणारा असेल. मनातल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. समाधान, आनंद आणि आपुलकी यांचा अनुभव आज तुम्हाला मिळेल.लकी अंक: 4लकी रंग: आकाशी निळा
advertisement
6/12
कन्या -कन्या राशीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आत्मविश्वास मजबूत राहील आणि आजूबाजूला सकारात्मकता जाणवेल. संवाद साधण्यासाठी आणि नाती सुधारण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. मनातल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करता येतील, त्यामुळे जवळीक वाढेल. तुमची समजूतदारपणा आणि सहानुभूती लोकांना भावेल. एखाद्या खास व्यक्तीसोबत चांगले सामंजस्य निर्माण होईल. एकंदरीत आजचा दिवस उत्साहवर्धक आणि समाधान देणारा आहे.लकी अंक: 11लकी रंग: नेव्ही ब्लू
advertisement
7/12
तूळ -तूळ राशीसाठी आजचा दिवस थोडा कठीण जाऊ शकतो. मानसिक ताण आणि भावनिक अस्थिरता जाणवू शकते. नात्यांमध्ये संयम ठेवणे आज खूप गरजेचे आहे. संवाद करताना नम्रता आणि प्रामाणिकपणा ठेवा. मतभेद निर्माण झाले तर ते शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करा. भावना व्यक्त करताना अडचण येऊ शकते, पण हा काळ आत्मजागरूकतेसाठी उपयुक्त आहे. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा, परिस्थिती हळूहळू सुधारेल.लकी अंक: 1लकी रंग: हिरवा
advertisement
8/12
वृश्चिक -वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. नात्यांमध्ये जवळीक आणि आपुलकी वाढेल. प्रियजनांशी मनमोकळेपणाने संवाद साधाल. जुन्या गोष्टी सोडून नवीन विचार स्वीकारण्याची तयारी असेल. तुमची संवेदनशीलता आणि समजूतदारपणा लोकांना तुमच्याजवळ आणेल. आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा आज तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल. नात्यांमध्ये समाधान आणि आनंद मिळेल.लकी अंक: 3लकी रंग: गडद हिरवा
advertisement
9/12
धनु -धनु राशीसाठी आजचा दिवस थोडा तणावपूर्ण असू शकतो. काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर जात असल्यासारख्या वाटू शकतात. मानसिक ताण आणि चिंता जाणवू शकते. नात्यांमध्ये थोडे गैरसमज होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संवाद जपून करा. हा काळ आत्मपरीक्षणाचा आहे. भावना संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करा. अडचणी असूनही त्या तुम्हाला अधिक अनुभव देणाऱ्या ठरतील.लकी अंक: 9लकी रंग: काळा
advertisement
10/12
मकर -मकर राशीसाठी आजचा दिवस खूप सकारात्मक आहे. जीवनात नवीन संधी आणि अनुभव मिळू शकतात. मेहनतीचे चांगले फळ मिळेल. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवायला मिळेल. नात्यांमध्ये समजूतदारपणा आणि गोडवा राहील. आत्मविश्वास वाढेल आणि पुढील वाटचालीसाठी नवी उमेद मिळेल. आजचा दिवस समाधान देणारा ठरेल.लकी अंक: 8लकी रंग: लाल
advertisement
11/12
कुंभ -कुंभ राशीसाठी आजचा दिवस थोडा अवघड असू शकतो. सभोवतालचे वातावरण नकारात्मक वाटू शकते आणि मन अस्वस्थ राहील. नात्यांमध्ये मतभेद किंवा तणाव जाणवू शकतो. मात्र हा काळ स्वतःला समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे. भावना दडपून न ठेवता त्यांचा स्वीकार करा. परिस्थिती कायम अशी राहणार नाही, हळूहळू सुधारणा होईल.लकी अंक: 5लकी रंग: पांढरा
advertisement
12/12
मीन -मीन राशीसाठी आजचा दिवस काही आव्हाने घेऊन येऊ शकतो. मनावर ताण जाणवेल आणि स्थिरता कमी वाटेल. नात्यांमध्ये गैरसमज होऊ शकतात, त्यामुळे बोलताना काळजी घ्या. छोट्या गोष्टी मोठ्या वादात बदलू नयेत याची दक्षता घ्या. हा काळ आत्मचिंतनाचा आहे. संयम ठेवलात आणि शांत राहिलात तर परिस्थिती नक्कीच सुधारेल.लकी लकी अंक: 7लकी रंग: जांभळा
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: शुक्रवारचा दिवस कोणासाठी लकी-अनलकी? मेष ते मीन 12 राशींचे दैनिक राशीफळ