मक्याच्या दरात लक्षणीय घट
कृषीमार्केट वेबसाईटवरील सायंकाळी 6.30 वाजताच्या रिपोर्टनुसार, राज्याच्या कृषीमार्केटमध्ये एकूण 6 हजार 093 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये 4 हजार 300 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 1400 ते जास्तीत जास्त 1950 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 3 क्विंटल मक्यास 2400 ते 2800 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. मक्याला बुधवारी मिळालेल्या मक्याच्या सर्वाधिक दरात लक्षणीय घट झाली आहे.
advertisement
कांद्याचे दर स्थिर
राज्याच्या कृषीमार्केटमध्ये आज 99 हजार 523 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 33 हजार 858 क्विंटल सर्वाधिक आवक सोलापूर बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 100 ते 2800 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या कांद्यास आज 2800 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. बुधवारी मिळालेला सर्वाधिक दर आजही स्थिर आहे.
सोयाबीनच्या दरात पुन्हा घसरण
राज्याच्या कृषी मार्केटमध्ये आज 19 हजार 791 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी लातूर मार्केटमध्ये 13 हजार 915 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3982 ते 4825 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. तसेच अकोला मार्केटमध्ये आवक झालेल्या 4 हजार 074 क्विंटल पिवळ्या सोयाबीनला प्रतीनुसार 4000 ते 4840 रुपये प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला. सोयाबीनच्या दरात आज पुन्हा घसरण झालेली दिसून येत आहे.





