Trigrahi Yog 2026: वाट पाहिल्याचं शुभफळ! मार्चमध्ये शनि-सूर्य-शुक्राच्या युतीचा या 5 राशींना दुहेरी फायदा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Trigrahi Yog 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा एकाच राशीत अनेक ग्रह एकत्र येतात, तेव्हा विशेष योगांची निर्मिती होते. या ग्रहांच्या युतीचा थेट परिणाम माणसाचे नशीब, करिअर आणि आर्थिक स्थितीवर होतो. पंचांगानुसार, मार्च 2026 मध्ये मीन राशीत असाच एक दुर्मिळ योगायोग जुळून येणार आहे.
advertisement
1/6

मीन राशीत शनिदेव आधीपासूनच विराजमान आहेत. त्यातच 2 मार्च रोजी शुक्र या राशीत प्रवेश करेल आणि 15 मार्चला सूर्यदेवही याच राशीत येतील. अशा प्रकारे मीन राशीत शनि, शुक्र आणि सूर्य या तीन मोठ्या ग्रहांच्या एकत्र येण्यामुळे 'त्रिग्रही योग' तयार होणार आहे. हा योग अनेक राशींसाठी फायदेशीर ठरेल, एकूण 5 राशींच्या लोकांसाठी हा काळ प्रगती आणि मोठा धनलाभ घेऊन येणारा आहे.
advertisement
2/6
मेष - मेष राशीच्या व्यक्तींच्या करिअरमध्ये एक नवीन ऊर्जा पाहायला मिळेल. तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आता पूर्ण होतील. नोकरीत पदोन्नती किंवा एखादी मोठी जबाबदारी मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत. व्यवसायात नफा वाढेल, कुटुंबाचे पूर्ण सहकार्य लाभेल आणि तुमचा आत्मविश्वासही वाढेल.
advertisement
3/6
वृषभ - या राशीच्या लोकांसाठी नशिबाची साथ खूप मजबूत असेल. अचानक धनलाभ होऊ शकतो किंवा उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ अधिकारी तुम्हाला सहकार्य करतील. एखादा जुना अडकलेला व्यवहार पूर्ण झाल्यामुळे मनात समाधान राहील आणि घरात आनंदाचे वातावरण असेल.
advertisement
4/6
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांना करिअरमध्ये सकारात्मक बदलाची संधी मिळेल. नवीन नोकरीची ऑफर किंवा व्यवसायाचा विस्तार करणे शक्य होईल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढेल आणि नवीन लोकांशी झालेले संपर्क भविष्यात खूप फायदेशीर ठरणार आहेत.
advertisement
5/6
कन्या - कन्या राशीच्या लोकांसाठी भागीदारीत केलेल्या कामातून मोठा फायदा होईल. वैवाहिक आयुष्यात गोडवा वाढेल आणि जोडीदाराशी असलेले संबंध सुधारतील. गुंतवणुकीसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. मानसिक ताण कमी होईल आणि आरोग्यातही चांगली सुधारणा पाहायला मिळेल. बऱ्याच काळापासून सतावणारी चिंता आता दूर होईल.
advertisement
6/6
मकर - मकर राशीच्या लोकांसाठी ही वेळ प्रगतीची नवी दारे उघडणारी असेल. एखादे मोठे यश तुमच्या पदरात पडू शकते आणि तुमच्या मेहनतीचे योग्य फळ तुम्हाला मिळेल. कामाच्या निमित्ताने केलेले छोटे प्रवास फायदेशीर ठरतील. स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतीमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय किंवा काम सुरू करण्याचा विचार करत असाल, तर नशीब तुम्हाला नक्कीच साथ देईल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Trigrahi Yog 2026: वाट पाहिल्याचं शुभफळ! मार्चमध्ये शनि-सूर्य-शुक्राच्या युतीचा या 5 राशींना दुहेरी फायदा