TRENDING:

मालवण हादरलं! कोळंब गाव कमिटी अध्यक्षांवर गोळीबार; काळजाचा ठोका चुकवणारा थरार, घटनास्थळावरचे PHOTO

Last Updated:
मालवण शहरालगत कोळंब खालचीवाडी परिसरात संदीप शेलटकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केला. शेलटकर थोडक्यात बचावले. पोलिस तपास सुरू असून परिसरात भीतीचे वातावरण आहे.
advertisement
1/6
मालवण हादरलं! कोळंब गाव कमिटी अध्यक्षांवर गोळीबार; काळजाचा ठोका चुकवणारा थरार
प्रतिनिधी भरत केसरकर, सिंधुदुर्ग: मालवण शहरालगत असलेल्या कोळंब खालचीवाडी परिसरात रविवारी रात्री रक्ताचा थरार घडला. कोळंब गाव कमिटीचे अध्यक्ष संदीप शेलटकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोराने अत्यंत जवळून गोळीबार केला. सुदैवाने, बंदुकीची गोळी शेलटकर यांच्या डोक्याच्या अगदी बाजूने गेल्याने मोठा अनर्थ टळला आणि ते थोडक्यात बचावले.
advertisement
2/6
या घटनेने संपूर्ण मालवण तालुक्यात खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास संदीप शेलटकर आपल्या घरी असताना हा हल्ला झाला. अज्ञात इसमाने त्यांच्यावर नेम धरून गोळी झाडली.
advertisement
3/6
गोळी लागली नसली तरी, गोळीचे छरे शेलटकर यांच्या घराच्या किचनमध्ये, अंगणात आणि बाहेर उभ्या असलेल्या दुचाकीवर मोठ्या प्रमाणावर विखुरलेले आढळले. यावरून हा हल्ला अत्यंत जवळून आणि जीवे मारण्याच्या उद्देशानेच करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
advertisement
4/6
गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर शेजारच्या स्वप्नील शिर्सेकर यांच्या कंपाऊंडच्या दिशेने जोरात धक्का देत पळून गेला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, ज्या ठिकाणाहून गोळी झाडण्यात आली तिथे बुटांचे ठसे उमटले आहेत. या खुणांवरून पोलीस आता आरोपीचा माग काढत आहेत.
advertisement
5/6
या जीवघेण्या हल्ल्यातून बचावल्यानंतर संदीप शेलटकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "हा मला कायमचा संपवण्याचाच कट होता. नशीब बलवत्तर म्हणून मी आज जिवंत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून संशयिताला तात्काळ बेड्या ठोकाव्यात."
advertisement
6/6
घटनेची माहिती मिळताच मालवण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घराच्या परिसरात विखुरलेले छरे आणि इतर तांत्रिक पुरावे पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. जुन्या वादातून हा प्रकार घडला की यामागे काही राजकीय कारण आहे, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मालवणसारख्या पर्यटनस्थळी अशा प्रकारे गोळीबार झाल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कोकण/
मालवण हादरलं! कोळंब गाव कमिटी अध्यक्षांवर गोळीबार; काळजाचा ठोका चुकवणारा थरार, घटनास्थळावरचे PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल