T20 World Cup : ना बुमराह, ना सूर्या... सलग 2 वर्ल्ड कप जिंकवणारा टीम इंडियाचा खरा हिरा!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
लागोपाठ दुसरा टी-20 वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाने इतिहास घडवला आहे. 2026 टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडचा 96 रननी पराभव केला आहे.
advertisement
1/7

टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने पहिले बॅटिंग करून 255 रनचा मोठा स्कोअर उभारला. एवढ्या बलाढ्य आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा फक्त 159 रनवर ऑलआऊट झाला.
advertisement
2/7
भारताकडून जसप्रीत बुमराहने 4, अक्षर पटेलने 3 विकेट घेतल्या. तर हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती आणि अभिषेक शर्मा यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. बॅटिंगमध्ये भारताकडून संजू, अभिषेक आणि इशानने धमाका केला.
advertisement
3/7
संजूने 46 बॉलमध्ये 89, अभिषेकने 21 बॉलमध्ये 52 आणि इशान किशनने 25 बॉलमध्ये 54 रनची खेळी केली. तर शिवम दुबेने 8 बॉलमध्ये नाबाद 26 रन केले. या धमाकेदार बॅटिंगमुळे टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 255 रनचा डोंगर उभारला.
advertisement
4/7
लागोपाठ दुसरा टी-20 वर्ल्ड कप जिंकणारी टीम इंडिया पहिलीच टीम ठरली आहे, तसंच घरच्या मैदानात वर्ल्ड कप जिंकण्याचा आणि एकूण 3 वर्ल्ड कप जिंकण्याचा विक्रमही टीम इंडियाच्या नावावर झाला आहे.
advertisement
5/7
2007 साली टीम इंडियाने धोनीच्या नेतृत्वात, 2024 साली रोहितच्या नेतृत्वात आणि आता 2026 साली सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाने इतिहास घडवला आहे. रोहित आणि सूर्या तसंच भारताला लागोपाठ 2 वर्ल्ड कप जिंकवून देण्यात एका खेळाडूचा महत्त्वाचा वाटा आहे.
advertisement
6/7
टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या फायनलमध्ये अक्षर पटेलने 3 ओव्हरमध्ये फक्त 27 रन देऊन 3 विकेट घेतल्या. याआधी सेमी फायनलमध्येही अक्षर पटेलने दोन उत्कृष्ट कॅच घेतले होते आणि एक विकेटही घेतली होती.
advertisement
7/7
याआधी 2024 टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्येही अक्षरने भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. अक्षरने 2024 ला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनलमध्ये 31 बॉलमध्ये 47 रनची खेळी केली, याशिवाय त्याने एक विकेटही घेतली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : ना बुमराह, ना सूर्या... सलग 2 वर्ल्ड कप जिंकवणारा टीम इंडियाचा खरा हिरा!