सूर्य-शनीची युती चमकावणार नशीब,1 महिना 'या' 3 राशींवर होणार पैशांचा वर्षाव!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्य आणि कर्मफळदाता शनी यांची युती अत्यंत प्रभावशाली मानली जाते. सूर्य आणि शनी हे पिता-पुत्र असले तरी ज्योतिषशास्त्रात त्यांच्यातील संबंध शत्रुत्वाचे मानले जातात.
advertisement
1/5

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्य आणि कर्मफळदाता शनी यांची युती अत्यंत प्रभावशाली मानली जाते. सूर्य आणि शनी हे पिता-पुत्र असले तरी ज्योतिषशास्त्रात त्यांच्यातील संबंध शत्रुत्वाचे मानले जातात. मात्र, जेव्हा हे दोन बलाढ्य ग्रह एकाच राशीत येतात, तेव्हा काही राशींसाठी हा काळ संघर्षाचा तर काहींसाठी 'राजयोग' घेऊन येणारा ठरतो.
advertisement
2/5
द्रिक पंचांगानुसार, 14 मार्चच्या रात्री 1:35 वाजता सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. या सौर संक्रमणाला मीन संक्रांती असे म्हणतात. मार्च 2026 मध्ये होणारे सूर्य आणि शनीचे हे महामिलन 3 राशींच्या जातकांसाठी वरदान ठरणार आहे. येणारा एक महिना तुमच्यासाठी धनवर्षाव आणि करिअरमध्ये मोठी प्रगती घेऊन येईल.
advertisement
3/5
मिथुन - करिअरमध्ये सुवर्णसंधी: मिथुन राशीच्या लोकांसाठी ही युती भाग्योदय घडवणारी ठरेल. नोकरीमध्ये प्रमोशनचे प्रबळ योग आहेत. तुमच्या कार्यक्षेत्रात वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. नवीन जबाबदारी मिळण्यासोबतच पगारवाढीची आनंदवार्ताही मिळू शकते. जे लोक परदेशात करिअर करू इच्छितात, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे.
advertisement
4/5
कर्क - आर्थिक लाभाचा काळ: कर्क राशीच्या जातकांना या काळात अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे किंवा जुनी येणी वसूल होतील. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर हा महिना तुम्हाला मोठा नफा मिळवून देऊ शकतो. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल आणि सामाजिक कार्यात तुमचा सक्रिय सहभाग वाढेल.
advertisement
5/5
मीन - अडथळे दूर होतील आणि प्रगती होईल: मीन राशीत शनीचे वास्तव्य असून तिथे सूर्याचे आगमन झाल्यामुळे तुमच्यातील ऊर्जा वाढेल. प्रलंबित कामे वेगाने पूर्ण होतील. राजकारण किंवा सरकारी क्षेत्राशी संबंधित असलेल्या लोकांसाठी हा काळ यशाचा उच्चांक गाठणारा असेल. तुमच्या निर्णयक्षमतेचे कौतुक होईल आणि नवीन व्यवसायातून फायदा होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
सूर्य-शनीची युती चमकावणार नशीब,1 महिना 'या' 3 राशींवर होणार पैशांचा वर्षाव!