IND vs NZ : 280 स्कोर झाला असता पण...टीम इंडियाला फायनलमध्ये 'या' चूका महागात पडणार
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
संजूची विकेट पडताच मॅच फिरली.कारण त्याच ओव्हरमध्ये ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव कॅच आऊट झाले.
advertisement
1/9

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रोमांचक सामना सूरू आहे. हा सामना कोण जिंकतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
advertisement
2/9
या सामन्यात न्यूझीलंडचा कॅप्टन मिचेल सँटनरने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.त्यामुळे टीम इंडियाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली होती.
advertisement
3/9
टीम इंडियाकडून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनने डावाची चांगली सूरूवात केली होती.दोघांन सूरूवात संथ केली पण नंतर गिअर बदलला.
advertisement
4/9
मागच्या अनेक सामन्यापासून फ्लॉप ठरलेल्या अभिषेक शर्माची आज बॅट तळपली आणि त्याने 18 बॉलमध्ये 50 धावा केल्या होत्या.त्यानंतर 21 बॉलमध्ये तो 52 धावा करून बाद झाला.
advertisement
5/9
त्याच्यानंतर दोघांनी मिळवून पॉवरप्लेमध्ये 92 धावांची खेळी केली होती. अभिषेक बाद झाल्यानंतर संजूने डाव सावरत तो आपल्या शतकाच्या जवळ पोहोचला होता. पण 46 बॉलमध्ये 89 धावा करून बाद झाला.
advertisement
6/9
संजूची विकेट पडताच मॅच फिरली.कारण त्याच ओव्हरमध्ये ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव कॅच आऊट झाले.ज्यावेळेस टीम इंडियाला तीन धक्के बसले त्यावेळेस भारताचा स्कोर 204 होती.
advertisement
7/9
या तीन विकेट पडल्यानंतर हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा मैदानात आला होता. पण त्याला शेवटच्या क्षणी हव्या तशा धावा काढता आल्या नाही. त्यात हार्दिक पांड्या 18 वर बाद झाला.
advertisement
8/9
पांड्या बाद झाल्यानंतर शिवम दुबेने मैदानात उतरून शेवटच्या ओव्हरला धुलाई करत चौकार षटकार मारत 24 धावा काढल्या त्यामुळे टीम इंडियाचा स्कोर 255 पार गेला. आता न्यूझीलंड समोर 256 लक्ष आहे.
advertisement
9/9
खरं तर सूर्य कुमार यादव,हार्दिक पांड्या आणि तिलक वर्माने आणखीण चांगली फलंदाजी केली असती तर टीम इंडियाचा डाव 280 पार गेला असता. पण या तीन खेळाडूंनी विकेट फेकल्यामुळे टीम इंडिया 255 पर्यंत सीमित राहिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : 280 स्कोर झाला असता पण...टीम इंडियाला फायनलमध्ये 'या' चूका महागात पडणार