T20 WC Final मध्ये ज्यांच्या राष्ट्रगीताने अंगावर शहारे आणले; दिग्गज गायिका 35 वर्ष देताएत 'या' आजाराशी झुंज
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
T20 WC Final: आज सुप्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्ती यांनी आपल्या सुमधूर आवाजात भारताचे राष्ट्रगीत गाऊन भारत विरुद्ध न्यूझिलंड या टी२० वर्ल्डकप फायनलची सुरुवात केली.
advertisement
1/12

९० चं दशक गाजवणाऱ्या आणि आपल्या आवाजाच्या जादूने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजाने आज नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एक वेगळ्याच उत्साह संचारला.
advertisement
2/12
आज त्यांनी आपल्या सुमधूर आवाजात भारताचे राष्ट्रगीत गाऊन भारत विरुद्ध न्यूझिलंड या टी२० वर्ल्डकप फायनलची सुरुवात केली.
advertisement
3/12
५० वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत ४५ हून अधिक भाषांमध्ये तब्बल ५०,००० पेक्षा जास्त गाणी गाणाऱ्या कविताजींचा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. त्यांच्या आयुष्यातील कठीण काळ वाचून तुम्हीही थक्क व्हाल.
advertisement
4/12
कविताजींचा जन्म एका तामिळ कुटुंबात झाला. त्यांचे वडील शिक्षण मंत्रालयात कामाला होते. वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी गाण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून त्यांनी आपल्या प्रतिभेची चमक दाखवली होती.
advertisement
5/12
पण तुम्हाला माहिती आहे का? कविताजींनी आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीला चक्क डबिंग आर्टिस्ट म्हणून काम केलं आहे.
advertisement
6/12
प्रसिद्ध संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्याकडे त्या गाण्यांचे डेमो रेकॉर्ड करायच्या, जे पुढे जाऊन लता मंगेशकर किंवा आशा भोसले गाणार असायच्या. त्यांचा पहिला ब्रेक १९७६ मध्ये 'कादंबरी' चित्रपटातून मिळाला आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.
advertisement
7/12
प्रसिद्ध संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्याकडे त्या गाण्यांचे डेमो रेकॉर्ड करायच्या, जे पुढे जाऊन लता मंगेशकर किंवा आशा भोसले गाणार असायच्या. त्यांचा पहिला ब्रेक १९७६ मध्ये 'कादंबरी' चित्रपटातून मिळाला आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.
advertisement
8/12
कविता कृष्णमूर्ती यांनी कधीच लग्नाचा विचार केला नव्हता. "मी आयुष्यभर अविवाहितच राहीन," असा त्यांचा ठाम निश्चय होता. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं.
advertisement
9/12
एकदा श्री सत्य साईबाबा यांनी त्यांना सांगितलं होतं, "संगीताच्या माध्यमातून तू अशा एका व्यक्तीला भेटशील, ज्याच्याशी तुझं लग्न होईल." आणि तसंच घडलं! गाण्याच्या रेकॉर्डिंग दरम्यान त्यांची भेट जगप्रसिद्ध व्हायोलिन वादक एल. सुब्रमण्यम यांच्याशी झाली.
advertisement
10/12
सुब्रमण्यम यांच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर ते आपल्या ४ मुलांचा सांभाळ एकटेच करत होते. कविताजींचं सुब्रमण्यम यांच्या मुलांशी इतकं घट्ट नातं विणलं गेलं की त्यांनी ११ नोव्हेंबर १९९९ रोजी त्यांच्याशी लग्न करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि त्या ४ मुलांच्या आई बनल्या.
advertisement
11/12
कविताजींच्या आवाजातला तोच गोडवा आजही टिकून आहे, पण त्यामागे एक मोठं दुःख दडलंय. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून त्या गंभीर सायनस आणि अस्थमा या आजाराने त्रस्त आहेत. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, अनेकदा सर्दी-खोकल्यामुळे त्यांना गाणं गाताना प्रचंड त्रास होतो.
advertisement
12/12
"कधीकधी श्वास घ्यायलाही त्रास होतो, पण मी कधीच गाणं सोडण्याचा विचार केला नाही. ही एक लढाई आहे जी मी दररोज लढते आणि देवाची आभारी आहे की मी दरवेळी जिंकते," असं त्या अभिमानाने सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
T20 WC Final मध्ये ज्यांच्या राष्ट्रगीताने अंगावर शहारे आणले; दिग्गज गायिका 35 वर्ष देताएत 'या' आजाराशी झुंज