'आपल्या कामाशी काम ठेव', भारताला अक्कल शिकवणाऱ्या अमेरिकेला कमल हसन यांनी झापलं, काढले ट्रम्प प्रशासनाचे वाभाडे!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Kamal Haasan slams Donald Trump: अमेरिकेने भारताला रशियन तेल खरेदी करण्यासाठी ३० दिवसांची तात्पुरती सवलत जाहीर केल्यानंतर, दाक्षिणात्य सुपरस्टार आणि राजकारणी कमल हसन यांचा पारा चढला आहे.
advertisement
1/8

जागतिक राजकारणात सध्या भारताच्या रशियन तेल खरेदीवरून चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे. अमेरिकेने भारताला रशियन तेल खरेदी करण्यासाठी ३० दिवसांची तात्पुरती सवलत जाहीर केल्यानंतर, दाक्षिणात्य सुपरस्टार आणि राजकारणी कमल हसन यांचा पारा चढला आहे.
advertisement
2/8
"आम्ही कोणाचे नोकर नाही," अशा शब्दांत त्यांनी थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खडे बोल सुनावले आहेत. कमल हसन यांनी आपल्या X हँडलवरून ट्रम्प यांना उद्देशून एक अत्यंत जळजळीत पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा आणि स्वाभिमानाचा पुनरुच्चार केला.
advertisement
3/8
हसन लिहितात, "आम्ही, भारताचे नागरिक, एका स्वतंत्र आणि सार्वभौम देशाचे आहोत. दूरवरच्या परकीय किनाऱ्यावरून येणारे आदेश ऐकण्याचे दिवस आता संपले आहेत. कृपया आपल्या कामाशी काम ठेवा. एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा आदर करणे हाच जागतिक शांततेचा पाया आहे."
advertisement
4/8
'मक्कल नीधी मय्यम' या पक्षाचे संस्थापक असलेल्या कमल हसन यांनी हे पत्र "एक अभिमानी भारतीय नागरिक" म्हणून स्वाक्षरी करून संपवले आहे.
advertisement
5/8
सध्या आखाती देशांमधील तणावामुळे जागतिक स्तरावर तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत, समुद्रात अडकून पडलेलं रशियन कच्चं तेल भारताला विकत घेता यावं, यासाठी अमेरिकेच्या तिजोरी विभागाने ५ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीसाठी ३० दिवसांची सवलत दिली आहे.
advertisement
6/8
मात्र, याला सवलत म्हणण्याऐवजी अमेरिकेने भारताला दिलेली परवानगी असं स्वरूप मिळाल्यामुळे भारतातील राजकीय वर्तुळात संतापाची लाट आहे. कमल हसन यांच्या मते, भारताने आपलं ऊर्जा धोरण ठरवण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज भासू नये.
advertisement
7/8
कमल हसन यांच्या या भूमिकेमुळे देशांतर्गत राजकारणातही चर्चांना उधाण आलं आहे. सरकारने या सवलतीला राजनैतिक यश मानलं असून, यामुळे संकटकाळात देशाची ऊर्जा सुरक्षा अबाधित राहील, असं म्हटलं आहे.
advertisement
8/8
तर, काँग्रेसने हसन यांच्या सुरात सूर मिसळत म्हटलं की, भारत एक स्वतंत्र देश आहे आणि आपल्याला तेल कुठून खरेदी करायचं यासाठी दुसऱ्या देशाच्या परवानगीची अजिबात गरज नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'आपल्या कामाशी काम ठेव', भारताला अक्कल शिकवणाऱ्या अमेरिकेला कमल हसन यांनी झापलं, काढले ट्रम्प प्रशासनाचे वाभाडे!