TRENDING:

3.5 मिलियन फॉलोअर्स, सनी लिओनीसोबत डेब्यू, कोण आहे पृथ्वी शॉची होणारी बायको? सातवा फोटो पाहून व्हाल क्लीन बोल्ड

Last Updated:
Prithvi Shaw Akriti Agarwal: पृथ्वी शॉच्या साखरपुड्याची बातमी समजताच, त्याच्या होणाऱ्या पत्नीबद्दल जाणून घेण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
advertisement
1/9
3.5 मिलियन फॉलोअर्स, सनी लिओनीसोबत डेब्यू, कोण आहे पृथ्वी शॉची होणारी बायको?
भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज ओपनर पृथ्वी शॉने आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची इनिंग सुरू केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या, त्या आपल्या प्रेयसीसोबत म्हणजेच आकृती अगरवाल हिच्यासोबत पृथ्वीने साखरपुडा केला आहे.
advertisement
2/9
रविवारी संध्याकाळी पृथ्वीने सोशल मीडियावर आपल्या साखरपुड्याचे रोमँटिक फोटो शेअर करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली.
advertisement
3/9
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या लग्नानंतर अवघ्या काही तासांतच त्याचा जवळचा मित्र पृथ्वी शॉ यानेही आयुष्यातील मोठं पाऊल उचललं आहे. साखरपुड्याचे फोटो शेअर करताना पृथ्वीने लिहिलंय, "मैदानावर षटकार मारण्यापासून ते आयुष्याची मोठी इनिंग खेळण्यापर्यंत... ती माझी परफेक्ट इनिंग्स आहे!"
advertisement
4/9
या फोटोंमध्ये पृथ्वी पांढऱ्या रंगाच्या शेरवानीत अत्यंत रुबाबदार दिसत आहे, तर आकृती गुलाबी रंगाच्या जरदोसी लेहेंग्यात एखाद्या परीसारखी भासत आहे. पृथ्वीने गुडघ्यावर बसून आकृतीला अंगठी घातल्याचा फोटो सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.
advertisement
5/9
पृथ्वीच्या साखरपुड्याची बातमी समजताच, त्याच्या होणाऱ्या पत्नीबद्दल जाणून घेण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
advertisement
6/9
२ मे २००३ रोजी लखनऊमध्ये जन्मलेली आकृती लहानपणीच कुटुंबासह मुंबईत स्थायिक झाली. तिने मुंबईच्या निर्मला मेमोरियल फाउंडेशन कॉलेजमधून मॅनेजमेंट स्टडीज (BMS) पूर्ण केले आहे.
advertisement
7/9
आकृती ही एक सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. तिचे इंस्टाग्रामवर ३.४ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिने लॉकडाऊन दरम्यान डान्स आणि लिप-सिंक व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवली.
advertisement
8/9
केवळ सोशल मीडियाच नाही, तर आकृतीने अभिनय क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. ३० जानेवारी २०२६ रोजी रिलीज झालेल्या 'त्रिमुखा' या सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटातून तिने पदार्पण केलं. विशेष म्हणजे, या चित्रपटात तिने सनी लिओनी सोबत स्क्रीन शेअर केली आहे.
advertisement
9/9
पृथ्वी आणि आकृती गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा त्यांना मुंबईत एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. नुकत्याच पार पडलेल्या अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्येही या दोघांच्या जोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
3.5 मिलियन फॉलोअर्स, सनी लिओनीसोबत डेब्यू, कोण आहे पृथ्वी शॉची होणारी बायको? सातवा फोटो पाहून व्हाल क्लीन बोल्ड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल