T20 World Cup : गौतम समोर असताना सूर्याचं मोठं धाडस; राहुल द्रविडला दिलं विजयाचं श्रेय, गंभीरचं तोंडच पडलं!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Suryakumar Yadav Press Conference : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप फायनलनंतर सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीर यांनी मीडियाला संभोधित केलं. त्यावेळी कॅप्टन सूर्याने एक असं वक्तव्य केलं की, सर्वांच्या भूवया उंचावल्या.
advertisement
1/7

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडियाने विजय मिळवत ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. तिसऱ्यांदा टीम इंडियाने ट्रॉफी उचलली आहे.
advertisement
2/7
टीम इंडियाने सांघिक खेळ करत वर्ल्ड कप जिंकला आहे. कुणा एकट्यामुळे वर्ल्ड कप जिंकला असं म्हणता येत नाही. अशातच आता सूर्यकुमार यादवने टीम इंडियाचं कौतुक केलं.
advertisement
3/7
वर्ल्ड कप फायनलनंतर सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीर यांनी मीडियाला संभोधित केलं. त्यावेळी कॅप्टन सूर्याने एक असं वक्तव्य केलं की, सर्वांच्या भूवया उंचावल्या.
advertisement
4/7
प्रेस कॉन्फरेन्समध्ये सूर्याने विजयाचं श्रेय हे टीम इंडियाच्या माजी दोन खेळाडूंना दिलं आहे. सूर्याने गंभीर शेजारी बसलेला असताना राहुल द्रविड आणि व्ही व्ही लक्ष्मण यांना ट्रॉफी समर्प्रित केली.
advertisement
5/7
मी हा टी-२० वर्ल्ड कप राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना समर्पित करू इच्छितो. राहुल भाईंनी भारतीय क्रिकेटसाठी जे केलं आहे, सीओईचे नेतृत्व कसं करत आहेत याबद्दल व्हीव्हीएस यांना समर्पित करतो, असं सूर्या म्हणाला.
advertisement
6/7
सूर्यकुमार यादव याने यावेळी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतरचं आगामी लक्ष देखील सांगितलं. मला आता ऑलिम्पिक्समध्ये भारतासाठी गोल्ड मेडल जिंकायचं आहे, असंही सूर्यकुमार यादव म्हणाला.
advertisement
7/7
दरम्यान, गंभीर यावेळी टीम इंडियाच्या खेळाडूंचं कौतूक केलं. ट्रॉफी महत्त्वाच्या असतात. आपण ट्रॉफी साजरे करायला सुरुवात केली पाहिजे, असं गंभीर यावेळी म्हणाला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : गौतम समोर असताना सूर्याचं मोठं धाडस; राहुल द्रविडला दिलं विजयाचं श्रेय, गंभीरचं तोंडच पडलं!