CNG किट लावताना 'या' गोष्टींकडे ठेवा लक्ष! अन्यथा जीव येऊ शकतो धोक्यात
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Car CNG Kit: पेट्रोल-डिझेलपेक्षा सीएनजी स्वस्त आहे. यामुळे अनेक लोक आपल्या वाहनांमध्ये सीएनजी किट बसवून घेतात. पण हे करत असताना काही गोष्टींची काळजी घेणे गरेजेच असते.
advertisement
1/6

Car CNG Kit: जास्तीत जास्त लोकांकडे मोठी वाहनं म्हणजेच कार आहेत. नियमितच्या कामांसाठी अनेक लोक कार वापरतात. कोणतंही वाहन वापरत असताना पेट्रोल-डिझेल वापरलं जातं. पण आता सीएनचीचा ऑप्शनही लोकांकडे आला आहे. पेट्रोल-डिझेलपेक्षा हे स्वस्त आहे. पण कारमध्ये सीएनची किट लावणे पेट्रोलच्या वाढत्या खर्चापासून बचावाचा बेस्ट पद्धत आहे. मात्र निष्काळजीपणा केल्यास हे जीवघेणेही ठरु शकते. तुम्हीही तुमच्या कारमध्ये सीएनजी किट लावण्याचा विचार करत असाल तर सुरक्षेच्या दृष्टीने या 5 गोष्टींकडे लक्ष देणे अनिवार्य आहे.
advertisement
2/6
नेहमी सरकार-मान्यताप्राप्त किट निवडा : बाजारात अनेक स्वस्त आणि लोकल सीएनजी किट उपलब्ध आहेत. परंतु सुरक्षिततेच्या कारणास्तव, नेहमीच आरटीओने मान्यता दिलेली आणि सरकारने मान्यता दिलेली सीएनजी किट निवडा. स्थानिक किटची फिटिंग्ज आणि क्वालिटी मानकांनुसार नसू शकते, ज्यामुळे गॅस गळती किंवा शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याचा धोका वाढतो. नेहमी प्रतिष्ठित डीलरकडून किट बसवा.
advertisement
3/6
तुमच्या आरसीवर सीएनजी नोंदणी अनिवार्य : किट बसवल्यानंतर, तुमच्या वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्रावर (आरसी) त्याची नोंदणी करणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. हे करण्यासाठी, तुम्हाला आवश्यक कागदपत्रे आणि फिटिंग प्रमाणपत्र आरटीओ कार्यालयात सादर करावे लागेल. असे न केल्यास मोठा दंड होऊ शकतो, यासोबतच अपघात झाल्यास तुम्ही तुमचा विमा क्लेम देखील गमावू शकता.
advertisement
4/6
गॅस सिलेंडरची हायड्रो-टेस्टिंग आणि कंपलायन्स : तुमच्या सीएनजी सिलेंडरची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, दर तीन वर्षांनी त्याची हायड्रो-टेस्टिंग करणे अत्यंत महत्वाचे आहे. ही टेस्ट सिलेंडरची ताकद आणि टिकाऊपणा तपासते. शिवाय, किट बसवल्यानंतर, तुम्हाला एक 'कंप्लायन्स प्लेट' मिळेल जी तुम्ही तुमच्या कारला जोडता. सिलेंडरची एक्सपायरी डेट आणि टेस्टिंग तारीख नेहमी लक्षात ठेवा.
advertisement
5/6
वेळोवेळी सर्व्हिस आणि लीकेज तपासा : सीएनची कारला पेट्रोल कारच्या तुलनेत जास्त देखरेखीची गरज असते. याचे स्पार्क प्लग, एयर फिल्टर आणि वाल्वची नियमित तपासणी करत राहा. कारच्या आत थोडाही गॅसचा वास आला तर तत्काळ इंजिन बंद करुन विंडो ओपन करा. कधीही स्वतः लिकेच दुरुस्त करण्याचा प्रयत्न करु नका. एखाद्या एक्सपर्ट मॅकेनिकला दाखवा.
advertisement
6/6
सीएनजी भरताना घ्यावयाची काळजी : पेट्रोल स्टेशनवर सीएनजी भरताना नेहमीच इंजिन बंद करा आणि गाडीतून बाहेर पडा. तसेच, गाडीच्या आत मोबाईल फोन वापरणे किंवा धूम्रपान करणे टाळा. सीएनजी भरताना नेहमी सिलेंडरच्या दाबाचे निरीक्षण करा; जास्त दाबामुळे सिलेंडर खराब होऊ शकतो. नेहमी क्वालिटी फिलिंग स्टेशनमधून गॅस भरा.