TRENDING:

Bajaj आता मार्केट करणार जाम, आणली स्वस्तात मस्त अशी स्कुटर, किंमत आणि रेंजही जबरदस्त

Last Updated:
बजाजने आपली लोकप्रिय चेतक इलेक्ट्रिक स्कूटरचं स्वस्तात मस्त असं मॉडेल लाँच केलं आहे. नवीन  चेतक C25 अखेरीस मार्केटमध्ये दाखल झाली आहे.
advertisement
1/11
Bajaj आता मार्केट करणार जाम,आणली स्वस्तात मस्त स्कुटर, किंमत आणि रेंजही बेस्ट
भारतातील सर्वात मोठी बाइक आणि रिक्षा उत्पादक कंपनी असलेल्या बजाज ऑटोने आता मार्केटमध्ये नवीन धमाका केला आहे. बजाजने आपली लोकप्रिय चेतक इलेक्ट्रिक स्कूटरचं स्वस्तात मस्त असं मॉडेल लाँच केलं आहे. नवीन  चेतक C25 अखेरीस मार्केटमध्ये दाखल झाली आहे. चेतक सीरिजमध्ये ही सगळ्यात स्वस्त अशी स्कुटर आहे. या स्कुटरची किंमत एक्स-शोरूम  91,399 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. 
advertisement
2/11
Bajaj Chetak C25 ही मध्यमवर्गीय कुटुंबीयांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आली आहे. आधीच्या चेतक स्कुटरपेक्षा नवीन Bajaj Chetak C25 ही वजनाने हलकी आणि पॉवरफुल आहे.
advertisement
3/11
आधीच्या चेतक C2501 या व्हेरिएंट्सच्या तुलनेत ही स्कुटर आता आणखी स्लिम आणि हलकी आहे. Bajaj Chetak C25 चं  कर्ब वेट फक्त 108 किलो आहे.  तर सीटची उंची फक्त 763 मिमी आहे.  
advertisement
4/11
Bajaj Chetak C25 च्या डिझाइनबद्दल बोलायचं झालं तर या स्कुटरचा लूक हा आधीच्या चेतक सारखाच आहे. यामध्ये फार काही बदल केला नाही. फक्त डिझाइन एलिमेंट्सना नवीन रूप दिलं आहे
advertisement
5/11
यात नवीन गोल एलईडी हेडलॅम्प आहे, ज्यात इंडिकेटर्स इंटिग्रेटेड आहेत. रिअर सेक्शनलाही नवीन डिझाइन दिलं आहे आणि यात सिंगल युनिट टेल-लॅम्प हाउसिंग आहे.
advertisement
6/11
जुन्या व्हेरिएंट्समध्ये जिथे कलर-मॅच्ड मिरर मिळायचे, तिथे आता ब्लॅक प्लास्टिक मिरर दिले आहेत. फ्लश-माउंटेड पिलियन फुटपेग्स आणि पार्किंग ब्रेक लॉकसारख्या प्रीमियम फिचर्सही दिले आहे.  Bajaj Chetak C25 ही 6 रंगांमध्ये उपलब्ध आहे, ज्यात ब्राइट रेड, यलो, क्लासिक व्हाइट आणि ब्लॅक यांचा समावेश आहे.
advertisement
7/11
Bajaj Chetak C25 मध्ये आता  2.5kWh बॅटरी, हब-माउंटेड मोटर C2501 मध्ये 2.5kWh ची बॅटरी पॅक आहे, जी फ्लोरबोर्डखाली बसवली आहे आणि कंपनीनुसार ही 113 किमी रेंज देते. पहिल्यांदाच चेतकमध्ये बजाजने हब-माउंटेड मोटर वापरली आहे, जी 1.8kW सतत आणि 2.2kW पीक पॉवर देते. याचा टॉप स्पीड 55 किमी प्रतितास इतका आहे
advertisement
8/11
ही स्कुटर शहरात चालवण्यासाठी सोईस्कर आहे.   750W च्या ऑफ-बोर्ड चार्जरने बॅटरी 0 ते 80% चार्ज होण्यासाठी 2 तास 25 मिनिटं लागतात तर फुल चार्जसाठी 3 तास 45 मिनिटं लागतील.
advertisement
9/11
आधीच्या चेतकमध्ये लीडिंग-लिंक फ्रंट सस्पेंशन दिले आहे, तर  C25 मध्ये पारंपारिक टेलीस्कोपिक फोर्क आणि रिअरला ट्विन शॉक अब्जॉर्बर दिले आहेत. फ्रंट डिस्क ब्रेक कायम ठेवला आहे, त्यामुळे ब्रेकिंग परफॉर्मन्स चांगला मिळतो.
advertisement
10/11
Bajaj Chetak C25 मध्ये कलर एलसीडी डिस्प्ले आहे, ज्यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीद्वारे कॉल अलर्ट, एसएमएस नोटिफिकेशन आणि म्युझिक कंट्रोलची सुविधा आहे. यात हिल-होल्ड असिस्टही आहे, त्यामुळे स्कूटर 19% च्या चढावरही दोन लोकांसह सहज चढ पार शकते.  याशिवाय Bajaj Chetak C25 मध्ये २ रायडिंग मोड (इको आणि स्पोर्ट), रिव्हर्स असिस्ट फंक्शन, यूएसबी चार्जिंग पोर्ट, फ्रंट एप्रन कॅबी आणि 25 लिटरचे मोठे अंडरसीट स्टोरेजही दिले आहे.
advertisement
11/11
Bajaj Chetak C25 ची किंमत  91,399 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. चेतक C25 ही आता इतक ईलेक्ट्रिक बाइकच्या स्पर्धेत स्वस्तात मस्त अशी स्कुटर आहे.  Bajaj Chetak C25  च्या लॉन्चिंगनंतर बजाजने आता शहरी भागातील ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी हा प्रयत्न केला आहे. ola, TVS, Honda च्या ईलेक्ट्रिक स्कुटरला टक्कर देण्यासाठी Bajaj Chetak C25 आता मार्केटमध्ये आली आहे. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Bajaj आता मार्केट करणार जाम, आणली स्वस्तात मस्त अशी स्कुटर, किंमत आणि रेंजही जबरदस्त
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल