33KM मायलेज देणाऱ्या या कारची जोरदार खरेदी! किंमत फक्त 6.26 लाख रुपयांपासून सुरू
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
कोणीही कार शोधताना अशी कार शोधत असतो, जी चांगलं मायलेज देईल. यासोबतच किंमतही परवडणारी असेल. अशीच एक भारतातील प्रसिद्ध कॉम्पॅक्ट सेडान Maruti Suzuki Dzire कार आहे.
advertisement
1/7

Maruti Suzuki Dzire : मारुती सुझुकीची पॉप्यूलर कॉम्पॅक्ट सेडान, डिझायरने भारतात 30 लाख (3 मिलियन)यूनिट्स विक्रीचा टप्पा ओलांडून एक नवीन विक्रम केलाय. आजच्या काळात, लोक एसयूव्हीच्या प्रेमात पडत असताना डिझायरने तिची लोकप्रियता कायम ठेवलीये. दर महिन्याला सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये ती स्थान मिळवतेय. बाजारात तिची मागणी इतकी जास्त आहे की गेल्या काही महिन्यांपासून ती कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार ठरतेय. देशातील सर्वोत्तम कारपैकी एक मानली जाते. चला या कारच्या फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
2/7
कंपनीने नुकतीच घोषणा करत म्हटले की, ही कार 2008 मध्ये लॉन्च झाली. कारने एकूण 30 लाख यूनिटची विक्री केली आहे. 2025 मध्ये ही कार देशातील सर्वाधिक विक्री करणारी कार ठरली. ज्यामध्ये 2.14 लाख यूनिट्स विकले आहेत.
advertisement
3/7
मारुती डिझायरची एक्स-शोरूम किंमत 6.26 लाख रुपये (LXi बेस)पासून सुरू होऊन 9.31 लाख रुपये (ZXi Plus टॉप) पर्यंत जातात. दिल्लीमध्ये ऑन-रोड प्राइज जवळपास 7.09 लाख ते 10.50 लाखपर्यंत होऊ शकते. पेट्रलो आणि फॅक्ट्री-फिटेड सीएनजी दोन्ही ऑप्शन उपलब्ध आहेत. लेटेस्ट जीएसटी अपडेटनंतर किंमती आणखी आकर्षक झाल्या आहेत. चला या कारची डिझाइन, इंजिनसह इतर डिटेल्स सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
4/7
Maruti Dzire ची डिझाइन : नवीन जनरेशन डिझायर (2024-25) चा लूक पूर्णपणे नवा आणि प्रीमियम आहे. पुढील स्लीक LED क्रिस्टल व्हिजन हेडलँप्स, फ्लोइंग LED DRLs आणि बोल्ड ग्रिल याला फ्यूचरिस्टिक बनवतात. मागे 3D ट्रिनिटी LED टेल लँप्स आणि क्रोम स्ट्रिप आहे. 15-इंच टू-टोन अलॉय व्हील्स, शार्क-फिन अँटीना आणि शार्प लाइन्स याला स्पोर्टी लूक देतात. 7 आकर्षक कलर्स उपलब्ध आहे.
advertisement
5/7
केबिन आणि कंफर्ट : याचे इंटीरियर स्पेशियस आणि प्रीमियम आहे. हे ड्यूअल-टोन ब्लॅक-बेज डॅशबोर्ड सिल्व्हर एक्सेंट्ससह येते. रियर AC व्हेंट्स, इलेक्ट्रिक सनरूफ आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल कंफर्ट वाढवतात. 9-इंच स्मार्टप्ले प्रो+ टचस्क्रीन, वायरलेस अॅपल कारप्ले-अँड्रॉइड ऑटो आणि 360° एचडी कॅमेरा टॉप व्हेरिएंटमध्ये आहे. रियर सीट स्पेस चांगला आहे. बूट स्पेसही 382 लिटरचा मिळतो.
advertisement
6/7
फीचर्स आणि सेफ्टी : कंपनी याला क्रूझ कंट्रोल, वायरलेस चार्जर, कीलेस एंट्री, Suzuki Connect टेलीमिटिक्स, रियर आर्मरेस्ट आणि USB पोर्ट्स सारख्या सुविधांसह विकते. इंफोटेनमेंटमध्ये ARKAMYS साउंड सिस्टम मिळते. सेफ्टीसाठी 5-स्टार ग्लोबल NCAP आणि भारत NCAP रेटिंग मिळाली आहे. सर्व व्हेरिएंटमध्ये 6 एयरबॅग्स स्टँडर्ड आहे. HEARTECT प्लॅटफॉर्म, ESP, हिल होल्ड, ABS-EBD, TPMS आणि ISOFIX याला खास बनवतात.
advertisement
7/7
इंजिन आणि मायलेज : कंपनी ही कार 1.2 लिटर 3-सिलिंडर Z12E पेट्रोल इंजिन (81.58 PS पॉवर, 111.7 Nm टॉर्क)सह विकते. हे 5-स्पीड मॅन्युअल किंवा AGS ऑटो ट्रान्समिशनसह येते. पेट्रोलमध्ये मायलेज 24.79 kmpl (MT) ते 25.71 kmpl (AGS) आणि CNG व्हेरिएंटमध्ये 69.75 PS सह 33.73 km/kg पर्यंत मिळते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
33KM मायलेज देणाऱ्या या कारची जोरदार खरेदी! किंमत फक्त 6.26 लाख रुपयांपासून सुरू