TRENDING:

Nashik News: कुंभमेळ्यापूर्वी नाशिकमध्ये सापडली 125 वर्षे जुनी दुर्लभ गोष्ट, दहा फूट खोल असलेल्या वास्तूने वाढलं रहस्य

Last Updated:

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी फोडण्यासाठी द्वारका सर्कल येथे अंडर पासचे काम केले जात होते. यावेळी 125 वर्षे जुनी दुर्लभ गोष्ट सापडल्यामुळे नाशिककरांचं रहस्य वाढलंय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वरभूमीवर नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी पंचवटी भागातील गोदाघाट परिसरामध्ये खोदकाम सुरू असताना काँक्रिटखाली असलेल्या वास्तुतून मोठ्या प्रमाणावर पाणी जमिनीतून बाहेर येत होतं. तिथे विहीरी असल्याचा खुलासा झाला होता. आता अशातच नाशिकच्या द्वारका परिसरामध्ये खोदकाम करताना 125 वर्षे जुनी विहीर असल्याचा खुलासा झाला आहे. इतकी वर्षे ही विहीर बंदिस्त स्वरुपात असतानाही या विहिरीचं पाणी अगदी स्वच्छ आणि वापरण्या योग्य आहे.
News18
News18
advertisement

द्वारका सर्कल जवळ सुरू असलेल्या अंडरपासच्या बांघकामावेळी 125 वर्षे जुन्या पुरातन विहिरीचा शोध लागला आहे. द्वारका परिसरामध्ये अंडरपास उभारण्याचे काम सुरू आहे, हे काम सुरू असताना दगडी बांधकामाची जुनी विहीर समोर आलेली आहे. कामगार रस्त्याचे खोद काम करताना त्यांना तब्बल दहा फूट खोलीपर्यंत पोहोचल्यानंतर एक पूर्णपणे पाण्याने भरलेली आढळून आली. खोदकामामध्ये आढळून आलेल्या विहीरीचे बांधकाम 1903 साली करण्यात आल्याची माहिती काही स्थानिक नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे या विहीरीला जवळपास 125 वर्षे जुना इतिहास असल्याचे बोलले जात आहे. जरीही इतकी वर्षे जुनी ही विहीर असली तरीही ती आजही स्वच्छ पाण्याने भरलेली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुढीपाडव्याआधी ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, आजचे भाव काय?
सर्व पहा

विहीरीचे बांधकाम स्वरूपात असून ते आजही अगदी भक्कम स्वरूपात आहे. आढळून आलेला हा पाण्याचा साठा शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आढळून आला असून भविष्यामध्ये जर नाशिककरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावला तर उपयुक्त ठरू शकतो. वाढते शहरीकरण आणि शहरातील वाढती लोकसंख्या पाहता सापडलेला पाण्याचा साठा आगामी काळामध्ये नाशिककरांसाठी फार महत्त्वाचा ठरू शकतो. शहरामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणचे पाणीसाठे नष्ट होऊ लागले आहेत. अंडरपासच्या कामामध्ये ही विहीर आढळल्यामुळे आता एमआयडीसी आणि मनपा या विहिरीबद्दल काय निर्णय घेणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik News: कुंभमेळ्यापूर्वी नाशिकमध्ये सापडली 125 वर्षे जुनी दुर्लभ गोष्ट, दहा फूट खोल असलेल्या वास्तूने वाढलं रहस्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल