TRENDING:

इलेक्ट्रिक वाहन 100% चार्ज करणे योग्य आहे? जाणून घ्या फायदे,नुकसान

Last Updated:
इलेक्ट्रिक वाहनं ही घरी सहज चार्ज केली जाऊ शकतात. अनेकदा लोक ईव्ही रात्रभर चार्जिंगला सोडतात. ज्यामुळे बॅटरी 100% पर्यंत चार्ज होते. चला जाणून घेऊया इलेक्ट्रिक गाड्यांना फूल चार्ज करावं की नाही?
advertisement
1/8
इलेक्ट्रिक वाहन 100% चार्ज करणे योग्य आहे? जाणून घ्या फायदे, नुकसान
भारतात इलेक्ट्रिक वाहनं म्हणजेच ईव्हीची क्रेझ ही झपाट्याने वाढतेय. लोक पेट्रोल आणि डिझेल गाड्या सोडून इलेक्ट्रिक कार आणि बाइककडे वळत आहेत. मात्र ईव्ही खरेदीनंतर सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो की, ईव्ही किती चार्ज करावी. अनेकदा एक्सपर्ट्स 80% चार्ज करण्याचा सल्ला देतात. असं केल्याने बॅटरीचं आरोग्य चांगलं राहतं आणि दीर्घकाळ फायदा मिळत राहतो. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
2/8
80% चार्जिंग नियम का गरजेचा? : आजच्या मॉडर्न ईव्हीमध्ये बॅटरी मॅनेजमेटमेंट सिस्टम म्हणजेच BMS लावलेला असतो. ही सिस्टम बॅटरीला सेफ आणि बॅलेन्स पद्धतीने काम करण्यात मदत करते. तरीही बॅटरी दरवेळी 100% चार्ज केली तर त्याच्या लाइफवर परिणाम होतो.
advertisement
3/8
80% पर्यंत चार्ज केल्याने बॅटरीवर कमी दबान पडतो. जास्त चार्जिंग लेव्हलमुळे बॅटरीमधील ब्लॉकेज वाढते, ज्यामुळे ती पूर्णपणे चार्ज होण्यास जास्त वेळ लागतो. म्हणूनच 80% ते 100% पर्यंत चार्ज होण्यास जास्त वेळ लागतो. 100% पर्यंत वारंवार चार्जिंग केल्याने बॅटरी लवकर कमकुवत होऊ शकते.
advertisement
4/8
बॅटरीची लाइफ वाढते : ईव्हीची बॅटरी खुप महाग असते. बॅटरी खराब झाली तर ती बदलण्यास खुप खर्च येतो. 80% पर्यंत चार्जिंग ठेवल्याने बॅटरीचे आरोग्य दीर्घकाळपर्यंत चांगले राहते.
advertisement
5/8
यामुळे बॅटरीची लाइफ वाढते आणि भविष्यात खर्च कमी लागतो. तुम्हाला लांबचा प्रवास करायचा असेल तर 100% पर्यंत चार्ज करणे ठिक आहे. मात्र रोजच्या वापरात 80% चा नियम फॉलो करणे बेस्ट ठरते.
advertisement
6/8
वेळेचीही बचत होते : पेट्रोल आणि डिझेल वाहनांप्रमाणे इलेक्ट्रिक वाहने काही मिनिटांत चार्ज होत नाहीत. बॅटरी 80% पर्यंत लवकर चार्ज होते, परंतु त्यानंतर चार्जिंगचा वेग कमी होतो. त्यामुळे 80% चार्जिंग काढून टाकल्याने वेळ वाचतो.
advertisement
7/8
याव्यतिरिक्त, चार्जिंग स्टेशन्सवर गर्दी कमी असते. ज्यामुळे इतरांना त्यांची वाहने जलद चार्ज करता येतात. बहुतेक इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम असते. जेव्हा तुम्ही ब्रेक लावता किंवा वेग कमी करता तेव्हा ही सिस्टम बॅटरीमध्ये ऊर्जा परत साठवते.
advertisement
8/8
बॅटरी आधीच 100% भरलेली असेल, तर ही अतिरिक्त ऊर्जा साठवता येत नाही. मात्र, बॅटरी 80% चार्ज झाली असेल, तर अजूनही जागा शिल्लक असते, ज्यामुळे तुम्ही रिजनरेटिव्ह ब्रेकिंगचा पूर्णपणे वापर करू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
इलेक्ट्रिक वाहन 100% चार्ज करणे योग्य आहे? जाणून घ्या फायदे,नुकसान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल