TRENDING:

Thyroid : थायरॉईडच्या रुग्णांसाठी डाएट टिप्स, रुग्णांनी घ्यायला हवी आहाराची काळजी, अन्यथा वाढू शकतं थायरॉईडचं प्रमाण

Last Updated:

थायरॉईडच्या दोन्ही प्रकारात, आहाराची भूमिका महत्त्वाची असते. आहार योग्य नसेल तर औषधांचाही फारसा फायदा होऊ शकत नाही. म्हणून, काय खावं आणि काय खाऊ नये हे जाणून घेणं महत्वाचं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : थायरॉईडचं प्रमाण वाढतंय. थायरॉईडचे दोन प्रकार असतात. गळ्यात असलेल्या थायरॉईड ग्रंथी योग्य प्रमाणात हार्मोन्स म्हणजेच संप्रेरकं तयार करत नाही तेव्हा ही स्थिती उद्भवते. या संप्रेरकांचं खूप कमी उत्पादन असेल तर त्याला हायपोथायरॉइड म्हणतात आणि जास्त उत्पादन असेल तर त्याला हायपरथायरॉइड म्हणतात.
News18
News18
advertisement

थायरॉईडच्या दोन्ही प्रकारात, आहाराची भूमिका महत्त्वाची असते. आहार योग्य नसेल तर औषधांचाही फारसा फायदा होऊ शकत नाही. म्हणून, काय खावं आणि काय खाऊ नये हे जाणून घेणं महत्वाचं आहे.

Self Care : छोट्या सवयींमुळे मिळेल मोठं यश, यशस्वितेची गुरुकिल्ली तुमच्याच खिशात

थायरॉईडच्या समस्या टाळण्यासाठी, कोणते पदार्थ टाळायचे ते समजून घेऊया.

advertisement

सोया आणि सोया उत्पादनं - सोया दूध, टोफू आणि सोया चंक्स सारख्या पदार्थांमुळे थायरॉईड औषधांचा प्रभाव कमी होऊ शकतो. विशेषतः जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी औषध घेत असाल तर त्या वेळी सोया खाणं टाळा. यामुळे हार्मोनल संतुलन बिघडू शकतं.

कच्चा कोबी आणि काही हिरव्या भाज्या - कोबी, फुलकोबी आणि ब्रोकोली सारख्या भाज्यांमधे काही विशिष्ट घटक असतात, ज्यामुळे शरीरातील आयोडीनचा उपयोग कमी होऊ शकतो. थायरॉईडच्या कार्यासाठी आयोडीन आवश्यक आहे. या भाज्या पूर्णपणे टाळण्याची गरज नाही, पण त्या कच्च्या खाणं टाळा आणि वापर मर्यादित करा.

advertisement

जंक आणि पॅकेज्ड फूड - चिप, स्नॅक्स, बर्गर, पिझ्झा, गोड बिस्किटं आणि जास्त तळलेल्या पदार्थांमुळे वजन वाढू शकतं. हायपोथायरॉईडीझममुळे वजन वाढतं, त्यामुळे ज्या पदार्थांमुळे वजन वाढतं असे पदार्थ टाळणं चांगलं.

जास्त साखर - केक, पेस्ट्री, कोल्ड्रिंक्स आणि इतर जास्त साखर असलेले पदार्थ जळजळ आणि थकवा वाढवू शकतात. थायरॉईड रुग्णांना आधीच अशक्तपणा आणि आळस जाणवतो. जास्त साखर खाल्ल्यानं ही समस्या वाढू शकते.

advertisement

ग्लूटेनयुक्त पदार्थ - गहू आणि मैद्याच्या पदार्थांमुळे काहींना सूज येते. ऑटोइम्यून थायरॉईड रोग असेल, तर डॉक्टरांच्या सल्ला घेतल्यानंतर ग्लूटेनचं सेवन कमी करण्याचा विचार करू शकता.

Phobia : कमिटमेंट फोबिया किंवा गॅमोफोबिया म्हणजे काय ? याचे परिणाम काय होतात ?

जास्त चहा, कॉफी आणि अल्कोहोल - जास्त प्रमाणात कॅफिन प्यायलं तर हृदयाची गती वाढू शकते आणि झोपेत व्यत्यय येऊ शकतो. हायपरथायरॉईडीझममुळे ही समस्या वाढते. अल्कोहोलमुळे हार्मोनल संतुलनावरही परिणाम होतो.

advertisement

थायरॉईड राखण्यासाठी काय करता येतं ?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
50 वर्षांच्या चवीची परंपरा,150 पदार्थांचे डेस्टिनेशन,पुण्यातील हे ठिकाण माहितीये
सर्व पहा

साधं, घरी शिजवलेलं जेवण खा. डाळी, हिरव्या भाज्या, फळं, दही खा आणि भरपूर पाणी खा. नेहमी तुमच्या डॉक्टरांच्या निर्देशानुसार आणि योग्य वेळी औषधं घ्या. थायरॉईड हा गंभीर आजार नाही, पण दुर्लक्ष केलं तर, गंभीर ठरु शकतो. योग्य आहार आणि नियमित तपासणीनं थायरॉईड सहजपणे नियंत्रित केला जाऊ शकतो.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Thyroid : थायरॉईडच्या रुग्णांसाठी डाएट टिप्स, रुग्णांनी घ्यायला हवी आहाराची काळजी, अन्यथा वाढू शकतं थायरॉईडचं प्रमाण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल