TRENDING:

पाकिस्तान हादरले, तालिबानचा PM शरीफ यांच्या ऑफिसजवळ हल्ला; चिनी संरक्षण यंत्रणेचे पुरते धिंडवडे, अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली

Last Updated:

Taliban Striking Pakistan Capital: अफगाण तालिबानच्या आत्मघाती ड्रोन्सनी थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद गाठून पंतप्रधान कार्यालयाजवळ असलेल्या लष्करी तळावर भीषण हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षेसाठी तैनात असलेली चिनी बनावटीची 'एअर डिफेन्स यंत्रणा' पुन्हा एकदा सपशेल अपयशी ठरल्याचे उघड झाले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
इस्लामाबाद: अफगाणिस्तानच्या आर्मीने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये ड्रोन हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. अफगाण तालिबानचा ड्रोन इस्लामाबादमधील फैजाबाद परिसरापर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. हा राजधानीतील अतिशय पॉश भाग असून येथे लष्कराचे मोठे ठाणे आहे. या ठिकाणापासून पंतप्रधान कार्यालय अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या सत्ताकेंद्रासाठी या भागाचे महत्त्व किती आहे, हे स्पष्ट होते.
News18
News18
advertisement

ड्रोन हल्ल्याची पुष्टी करताना तालिबानने म्हटले आहे की त्यांचे लढवय्ये आणि शस्त्रे पाकिस्तानच्या ‘गळ्यापर्यंत’ पोहोचू शकतात. अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे प्रवक्ते Zabihullah Mujahid यांनी शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हटले, आज आम्ही पाकिस्तानमधील महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले आहे. पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात आम्ही इस्लामाबादमध्ये ड्रोन हल्ला केला. आमचा संदेश स्पष्ट आहे. आमचा हात त्यांच्या गळ्यापर्यंत पोहोचू शकतो.

advertisement

शहबाज शरीफ यांचे कार्यालय सुरक्षित नाही?

तालिबानच्या आत्मघाती ड्रोन आणि हवाई कारवाईत इस्लामाबादमधील फैजाबाद येथील ‘एटॉमिक’ लष्करी ठाण्याला लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. देशाचे पंतप्रधान Shehbaz Sharif यांचे कार्यालय या ठिकाणापासून अत्यंत जवळ असल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. शुक्रवारी सकाळी 11 वाजता झालेल्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कर पंतप्रधानांना सुरक्षा देण्यात अपयशी ठरले का, असा सवाल विचारला जात आहे.

advertisement

अफगाण तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की त्यांच्या लढवय्यांनी इस्लामाबादमधील फैजाबाद कॅम्पव्यतिरिक्त नौशेरा येथील पाक लष्कर कॅन्टोनमेंट, जमरूद मिलिटरी कॉलनी आणि एबटाबाद येथे यशस्वी हल्ले केले. काबूलने स्पष्ट केले आहे की हे हल्ले पाकिस्तानने काबूल, कंधार आणि पक्तिया येथे केलेल्या हवाई कारवाईचा बदला म्हणून करण्यात आले.

इस्लामाबादचे 'सुरक्षा कवच': चिनी यंत्रणेवर मदार

advertisement

इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी असल्याने येथे सर्वाधिक कडक सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. पाकिस्तानची हवाई सुरक्षा (Air Defence) मुख्यत्वे चीनवर अवलंबून आहे. पाकिस्तानच्या हवाई सुरक्षेतील 70 ते 80% यंत्रणा चिनी बनावटीची आहे. इस्लामाबादभोवती अशा 10 ते 15 बॅटरी तैनात आहेत.

चिनी संरक्षण यंत्रणा अपयशी

2025 मधील 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारत-पाकिस्तान संघर्षात चिनी HQ-9 यंत्रणा भारतीय मिसाईल्स रोखण्यात पूर्णपणे यशस्वी ठरली नव्हती. त्यामुळे तज्ज्ञांनी याला 'जंक' (भंगार) असेही म्हटले होते.

advertisement

रशियन तंत्रज्ञानाची कॉपी: चीनची HQ-9 ही रशियन S-300 ची कॉपी असल्याचे मानले जाते, पण ती रशियन यंत्रणेइतकी मजबूत नाही.

ड्रोन आव्हाने: अफगाणिस्तानकडे प्रगत हवाई दल नसले तरी छोटे ड्रोन्स शोधणे आणि ते पाडणे हे कोणत्याही रडार सिस्टमसाठी मोठे आव्हान असते.

पाकिस्तानची युद्धघोषणा

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील चकमकीनंतर इस्लामाबादकडून ही युद्धाची सुरुवात असल्याचे म्हटले गेले आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री Khawaja Asif यांनी शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हटले की, आता आणखी सहन केले जाणार नाही. आम्ही अफगाण तालिबानविरुद्ध खुल्या युद्धाची घोषणा करत आहोत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
50 वर्षांच्या चवीची परंपरा,150 पदार्थांचे डेस्टिनेशन,पुण्यातील हे ठिकाण माहितीये
सर्व पहा

पाकिस्तानचा आरोप आहे की अफगाणिस्तानच्या भूमीवर टीटीपीसारख्या दहशतवादी गटांना आश्रय दिला जात आहे. हे गट पाकिस्तानच्या लष्करावर आणि सामान्य नागरिकांवर हल्ले करत आहेत. तालिबान सरकारने हे आरोप फेटाळले आहेत. दुसरीकडे पाकिस्तानने अफगाणिस्तानात टीटीपीचे ठिकाण असल्याचा दावा करत हवाई हल्ले केले आहेत.

मराठी बातम्या/विदेश/
पाकिस्तान हादरले, तालिबानचा PM शरीफ यांच्या ऑफिसजवळ हल्ला; चिनी संरक्षण यंत्रणेचे पुरते धिंडवडे, अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल