5 हजारांच्या डाउन पेमेंटवर Honda Activa खरेदी केल्यास EMI किती येईल? पाहा डिटेल्स
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Honda Activa on EMI: होंडा अॅक्टिव्हा देशातील सर्वात जास्त विकणारी स्कूटर आहे. ही स्कूटर खरेदी करण्यासाठी पाच हजार रुपयांची डाउन पेमेटं करावी लागेल. चला जाणून घेऊया डिटेल्स...
advertisement
1/6

भारतीय बाजारात Honda Activa सर्वात जास्त विकणाऱ्या स्कूटरमध्ये गणली जाते. या स्कूटरच्या तीन व्हेरिएंट मार्केटमध्ये सामिल आहेत. ज्यामध्ये स्टँडर्ड व्हेरिएंटची एक्स-शोरुम किंमत 75,433 रुपये, DLX व्हेरिएंटची किंमत 85,335 रुपये आणि H-Smart व्हेरिएंटची किंमत 89,806 रुपये आहे. या व्यतिरिक्त याच्या 25 Year Anniversary Edition ची किंमत 97,896 रुपये आहे.
advertisement
2/6
तुम्ही पूर्ण पैसे देण्याऐवजी या स्कूटरसाठी फायनान्स करायला प्राधान्य देत असाल, तर तुम्हाला मासिक EMI भरावे लागेल. Honda Activa च्या स्टँडर्ड मॉडेलची ऑन-रोड किंमत अंदाजे ₹87,448 आहे. या Honda दुचाकीसाठी तुम्हाला ₹82,448 चे कर्ज मिळू शकते. बँक या कर्जावर निश्चित व्याजदर आकारते, ज्यासाठी दरमहा EMI म्हणून बँकेत निश्चित रक्कम जमा करावी लागते.
advertisement
3/6
Honda Activa किती डाउन पेमेंटवर मिळेल? : होंडा अॅक्टिव्हा खरेदी करण्यासाठी तुम्हाला पाच हजार रुपयांची डाउन पेमेंट करावी लागेल.ही होंडा स्कूटर खरेदी करण्यासाठी, तुम्ही एका वर्षासाठी कर्ज घेतले आणि बँक या कर्जावर 9.7 टक्के व्याज आकारत असेल, तर तुम्हाला दरमहा 7,237 रुपये EMI भरावे लागतील.
advertisement
4/6
तुम्ही ही स्कूटर दीड वर्षासाठी लोनवर घेतली तर 9.7 टक्क्यांच्या व्याजाने 4,940 रुपयांच्या EMI दरमहा बँकेत जमा करावे लागेल.या होंडा स्कूटरसाठी तीन वर्षांसाठी कर्ज घेतल्यावर, दरमहा 9 टक्के व्याजदराने 2,649 रुपये ईएमआय जमा करावे लागेल.
advertisement
5/6
होंडा अ‍ॅक्टिव्हा खरेदी करण्यासाठी, चार वर्षांसाठी कर्ज घेतले जाते आणि बँक या कर्जावर 9.7 टक्के व्याज आकारते, म्हणून दरमहा 2,079 रुपयांचा EMI भरावा लागेल.
advertisement
6/6
होंडा अॅक्टिव्हासाठी लोन कोणत्याही बँकेतून घ्या. पण लोन घेण्यापूर्वी डॉक्यूमेंट व्यवस्थित वाचा. वेगवेगळ्या बँकांच्या वेगवेगळ्या पॉलिसीनुसार त्यांच्या आकड्यांमध्ये अंतर पाहायला मिळू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
5 हजारांच्या डाउन पेमेंटवर Honda Activa खरेदी केल्यास EMI किती येईल? पाहा डिटेल्स