TRENDING:

Mahindra ची टँकसारखी SUV, सेफ्टीमध्ये टाटाची केली बरोबरी, किंमतही केली कमी!

Last Updated:
. काही महिन्यांपूर्वी महिंद्राची XUV 3XO ही छोटी आणि शानदार एसयुव्ही लाँच केली होती. आता एसयूव्हीला ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे
advertisement
1/7
Mahindra ची टँकसारखी SUV, सेफ्टीमध्ये टाटाची केली बरोबरी, किंमतही केली कमी!
भारतात सध्या एसयूव्ही गाड्या घेण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. पण स्वस्तात आणि मस्त अशा एसयूव्ही मार्केटमध्ये दाखल झाल्या आहेत. टाटा मोटर्स आणि महिंद्राने मात्र स्वस्त गाडीसह सेफ्टीवर खास लक्ष दिलं आहे. काही महिन्यांपूर्वी महिंद्राची XUV 3XO ही छोटी आणि शानदार एसयुव्ही लाँच केली होती. आता एसयूव्हीला ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे आणि तिची किंमतही बजेट आहे.
advertisement
2/7
भारत एनसीएपी कडून क्रॅश टेस्टमध्ये महिंद्रा XUV 3XO ला 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. ही कार तीन इंजिन ऑप्शनसह येते. या कारच्या पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 1.2-लिटर टर्बो आणि 1.2-लिटर TGDi चा ऑप्शन आहे. या कारच्या इंजिनमध्ये 1.5 लिटर टर्बो डिझेलचा ऑप्शन देखील समाविष्ट आहे. ही 5 सीटर कार 16 रंगांमध्ये येते. या महिंद्रा कारमध्ये स्कायरूफ देखील देण्यात आला आहे. महिंद्रा XUV 3XO ची एक्स-शोरूम किंमत 7.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 15.56 लाख रुपयांपर्यंत जाते.
advertisement
3/7
यात तीन इंजिन पर्याय आहेत - १.२ लीटर टर्बो पेट्रोल (११० बीएचपी), १.२ लीटर डायरेक्ट-इंजेक्शन टर्बो पेट्रोल (१३१ बीएचपी) आणि १.५ लीटर डिझेल (११७ बीएचपी). यात ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, ६-स्पीड मॅन्युअल आणि एएमटीचा पर्याय आहे. त्याची अंतर्गत रचना XUV400 Pro इलेक्ट्रिक SUV सारखीच आहे.
advertisement
4/7
यात पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटीसह १०.२५-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अपडेटेड ७-स्पीकर हरमन कार्डन म्युझिक सिस्टम, १०.२५-इंच पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आहेत. यात ADAS लेव्हल-२ आणि ३६० अंश कॅमेरा देखील आहे.
advertisement
5/7
महिंद्रा एक्सयूव्ही 3 एक्सओचं डिझाईन नावीन्यपूर्ण आहे. समोरच्या बाजूने तिचे डिझाईन बोल्ड तर बाजूने आणि मागील बाजूला ते प्रीमिअम वाटते. एसयूव्हीत 26.03cm चे ट्विन एचडी स्क्रीन आहेत. ते अँड्रॉईड ऑटो आणि ॲपल कार प्लेला सपोर्ट करतात. कारमधील सीट आरामदायी आहेत. सामान ठेवण्यासाठी कारमध्ये 364 लिटर बूट स्पेस मिळते.
advertisement
6/7
या कारमध्ये सुरक्षेसाठी लेव्हल 2 एडीएएस, अँटि लॉक ब्रेकिंग सिस्टीम, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टीम, 6 एअर बॅग्ज, सर्वांत मोठं सनरूफ आणि 360 अंशाचा कॅमेरा अशी फीचर्स आहेत.
advertisement
7/7
तिसरे इंजिन 1.5 लिटर टर्बो डिझलचे आहे. ते 86kw पॉवर आणि 300Nm टॉर्क जनरेट करते. या इंजिनला मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअर बॉक्स जोडलेले आहेत. ही कार 21.2 किलोमीटर /लिटर मायलेज देते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Mahindra ची टँकसारखी SUV, सेफ्टीमध्ये टाटाची केली बरोबरी, किंमतही केली कमी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल