फक्त 15 हजारांच्या EMIवर Maruti Baleno खरेदी करायचीये? पाहा किती डाउन पेमेंट द्यावी लागेल
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Maruti Baleno on EMI: तुम्ही मारुती बलेनो खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला दरमहा किती ईएमआय द्यावा लागेल हे जाणून घेणे खुप गरजेचे आहे. आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.
advertisement
1/7

भारतीय बाजारात उपलब्ध मारुती बलेनो एक शानदार 5-सीटर कार आहे. मारुतीच्या या गाड्यांची एक्स-शोरुम किंमत 5.99 लाख रुपयांपासून सुरु होऊन 9.10 लाख रुपयांपर्यंत जाते.
advertisement
2/7
मारुती बलेनोच्या सर्वात स्वस्त मॉडल Sigma (पेट्रोल) ची ऑन-रोड किंमत 6.81 लाख रुपये आहे. मारुतीची ही गाडी खरेदी करण्यासाठी एकदाच पूर्ण पेमेंट करण्याची गरज नाही. कार लोनवरही ही गाडी खरेदी केली जाऊ शकते.
advertisement
3/7
मारुती बलेनोच्या सिग्मा (पेट्रोल) व्हेरिएंटची किंमत सात लाख रुपयांहून कमी आहे. मारुतीही ही कार खरेदी करण्यासाठी 68 हजार रुपयांची डाउन पेमेंट करावी लागेल. तुम्हाला ईएमआय अमाउंट कमी करायची असेल तर जास्त डाउन पेमेंटही करु शकता.
advertisement
4/7
तुम्हाला दरमहा किती EMI भरावा लागेल? : तुम्ही मारुती बलेनो खरेदी करण्यासाठी चार वर्षांसाठी कर्ज घेतले आणि या कर्जाचा व्याजदर 9% असेल, तर मासिक EMI सुमारे 15,250 रुपये असेल.
advertisement
5/7
बलेनो खरेदी करण्यासाठी तुम्ही पाच वर्षांसाठी लोन घेतले तर 9 टक्क्याच्या व्याजाने दरमहा 12,750 रुपयांचा हप्ता जमा करावा लागेल. मारुतीची ही कार खरेदी करण्यासाठी तुम्ही सहा वर्षांसाठी लोन घेतले तर 11,000 रुपये दर महिन्याच्या ईएमआय म्हणून जमा करावे लागतील.
advertisement
6/7
तुम्हाला 10,000 रुपयांपेक्षा कमी EMI असलेली मारुती बलेनो खरेदी करायची असेल, तर तुम्ही सात वर्षांसाठी कर्ज घेऊ शकता. यामुळे 9% व्याजदराने फक्त 9,900 रुपयांचा EMI मिळेल.
advertisement
7/7
मारुती बलेनो खरेदी करण्यासाठी, तुम्ही तुमच्या मासिक हप्त्यावर आधारित कर्ज घेऊ शकता. तसंच, कर्ज घेण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची काळजीपूर्वक तपासणी करणे महत्वाचे आहे. कार कंपन्या आणि बँकांमधील वेगवेगळ्या धोरणांमुळे हे आकडे बदलू शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
फक्त 15 हजारांच्या EMIवर Maruti Baleno खरेदी करायचीये? पाहा किती डाउन पेमेंट द्यावी लागेल