TRENDING:

1999 रुपये EMI भरा आणि कार घरी आणा! Maruti ची जबरदस्त ऑफर, शोरूमबाहेर लागल्या रांगा

Last Updated:
भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने जीएसटी कपात आणि नवरात्री उत्सवाचं औचित्य साधून विक्रमी विक्री केली आहे.
advertisement
1/8
1999 रुपये EMI भरा आणि कार घरी आणा! Maruti ची जबरदस्त ऑफर, शोरूमबाहेर रांगा
ुंबई:  केंद्र सरकारने जीएसटीच्या स्लॅबमध्ये बदल केल्यामुळे सर्वच क्षेत्रात याचे परिणाम झाले आहे. ऑटो इंडस्ट्रीमध्ये याचा परिणाम मोठ्या प्रमाणात पाहण्यास मिळाला. सण उत्सवाच्या काळात लोकांनी मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी केली. भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने जीएसटी कपात आणि नवरात्री उत्सवाचं औचित्य साधून विक्रमी विक्री केली आहे. विशेष म्हणजे, मारुती सुझुकीने दररोज जवळपास ८० हजाराहून अधिक वाहनांची विक्री केली आहे.
advertisement
2/8
विशेष म्हणजे, मारुती सुझुकीने जीएसटी कपात आणि नवरात्र उत्सवाचं लक्षात घेऊन खास ऑफर दिली होती. कंपनीने कार खरेदीसाठी फक्त १९९९ रुपये महिना अशी ऑफर आणली आहे. त्यामुळे साहजिक कार खरेदीसाठी एकच झुंबड उडाली. बाईकच्या ईएमआयमध्ये कार येत असल्यामुळे लोकांनी एकच गर्दी केली.
advertisement
3/8
मारुती सुझुकीची S-Presso ही कार सगळ्यात स्वस्त कार ठरली आहे. या कारची किंमत आता ३.५० लाख इतकी आली आहे. त्यामुळे या फेस्टिव्हल सिझनमध्ये कंपनीने या कारवर 1999 रुपये EMI ऑफर आणली. जीएसटी कपातीमुळे या कारच्या किंमतीत तब्बल  1.29 लाख रुपये कमी झाले आहे.
advertisement
4/8
ऑफर कधीपर्यंत? - मारुती सुझुकी कंपनीने आपल्या छोट्या वाहनांच्या विक्रीवर भर दिला आहे. सगळ्या गाड्यांच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे कमी EMI वर कार देणे सहज शक्य झालं आहे.
advertisement
5/8
मारुती सुझुकीने आपल्या एंट्री लेव्हल गाड्यांवर २४ टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. ही ऑफर ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत असणार आहे. त्यामुळे मारुती सुझुकीच्या छोट्या कार खरेदीची ही सुवर्णसंधी आहे.
advertisement
6/8
खरंतर जीएसटीच्या दरात कपात झाल्यामुळे ज्या ४ मिटरपेक्षा छोट्या कार आहे, त्यांच्या किंमती कमी झाल्या आहेत. मारुती सुझुकीच्या अनेक गाड्यांची किंमत ही मार्केटमधील इतर गाड्यांच्या तुलनेत कमी आहे.
advertisement
7/8
तसंच रिसेल व्हॅल्यू सुद्धा जास्त आहे. २२ सप्टेंबरपासून जीएसटी दरात कपात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मारुतीने तब्बल २५,००० कारची डिलिव्हरी केली.
advertisement
8/8
्यानंतर नवरात्रीच्या दिवशी ८०००० हजार वाहनांची विक्री केली. कंपनीने दावा केला आहे की, दररोज ८० हजारपेक्षा जास्त लोक कार खरेदी करण्याबद्दल चौकशी करत आहे.  
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
1999 रुपये EMI भरा आणि कार घरी आणा! Maruti ची जबरदस्त ऑफर, शोरूमबाहेर लागल्या रांगा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल